Followers

Sunday, 10 January 2021

"व्यसनाधीन" हा लेख नक्की वाचा व जास्तीतजास्त सेवकांपर्यत नक्की शेयर करा. नमस्कार

 


                         【"चर्चा बैठकीचा विषय"】

"देगा हरी पलंगावरी', अशे विचार पशुपक्षी पण करत नाही, मग मानव असूनही आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण, न करणाऱ्या वाईट व्यसनाधीन मानवांना "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" कश्या प्रकारे समजूत देऊन, त्यांचा कुटुंबाचा उद्धार करण्यास प्रेरित केले."

                          【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय खुप सुंदर आहे, कारण मार्गात यायच्या आधी मानव हा अंधविश्वासु होता. आपण देवाची पूजा केली, भक्ती केली, उपवास केला, दान-दक्षिणा दिली तर आपल्याला हरित म्हणजे परमेश्वर हा आपल्या स्वप्नांची किंवा कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारतो व आपले सर्व पाप नष्ट होऊन आपण स्वर्गलोकात जातो म्हणूनच भारत हा सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे ह्या ठिकाणी अनेक देवी-देवतांचे तीर्थस्थान देवळे आजही उभारलेली आहेत. दानधर्म हा सर्वश्रेष्ठ मानला जात आहेत परंतु मानव धर्मामध्ये 'महानत्यागी बाबा जुमदेवजींनी', ही म्हण खोटी केली आहे, कारण कर्म हे प्रधान आहे तुम्ही आपले कर्म चांगले कराल, तुम्ही आपली कमाई चांगल्या यशस्वी रीतीने पार पाडाल तुम्ही; व्यसन मुक्त व्हाल; अंधश्रद्धेतून मुक्त व्हाल तेव्हा तुम्ही मानव व्हाल. हे महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला शिकविले. वाईट व्यसनाधीन माणसाला पैसा कमावता येतो परंतु आपल्या कुटुंबाची, पालनपोषणाची जबाबदारी समजत नाही. कारण त्यांच्या समोर एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे, व्यसन!

मग या व्यसनासाठी मानव आपल्या कुटुंबाचे कोणत्याही प्रकारे हनन करू शकतो, मग झगडे असोत; घरातली चोरी असो; मुलांना मारझोड असो; यातील कुठली गोष्ट पशु वृत्ती आल्यामुळे त्या व्यसनी माणसाला कळत नव्हती.

पशुपक्षी जरी बुद्धीने कमी असले तरीपण सकाळी आपल्या पिलांसाठी चारा जमा करण्याकरीता आपले घरटे सोडतात. चिऊताई तर आपल्या चोचीतून दाणे आपल्या पिल्लांना भरवताना, आपण कितीतरी वेळा पाहिले आहे. पावसाळा लागताचं प्रत्येक पक्षी राहण्यासाठी आपले घरटे तयार करतात, पण व्यसनाधीन माणूस हे कधीही करत नाही. पशुपक्षी मुलांना फक्त मोठे करतात व त्यांना आपली जबाबदारी न देता त्यांचे वेगळेपण होते.

मानव हा समाजशील प्राणी आहे त्याला समाजात राहण्यासाठी आर्थिक-सामाजिक मानसिक, अन्न-वस्त्र-निवारा याची गरज असते परंतु हे सर्व तो विसरलेला असतो. महानत्यागी बाबा जुमदेवजींनी मानवाला एकता शिकवली, अंधश्रद्धेतून मुक्त केले व्यसनातून बाहेर काढले. 

आपला उद्धार करण्यासाठी साधुसंतांनी जप-तप मंत्र विधि सांगितली, परंतु महानत्यागी बाबा जुमदेवजींनी प्रपंचात राहून आपल्या जीवनाचा उद्धार करायला सांगितलेला आहे. त्यासाठी तत्व, शब्द, नियम आपल्या सेवकांना दिले आहेत. त्यागी जीवनासाठी, शट विकार दूर करण्यासाठी प्रत्येकाला त्यांनी आत्मविश्वासी, स्वावलंबी बनवले आहे. कुटुंबासाठी भाकरी कमवणे, खूप मोठी गोष्ट नाही, परंतु कुटुंबा सोबत बसून ती भाकरी खाण्यात जो आनंद आहे तो एकतेचा आहे. एवढा मोठा आनंदाचा क्षण दर दिवशी आम्हाला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी समजूत देऊन सेवकाचा व सेवकाला उद्धार करण्यास प्रेरित केले आहे.

"लाख कोटी होती या जगात पण उध्दार नाही, केला कुणी मानवाचा, एकच सूर्य उगवला भूवरी क्रांतिवीर, तेजोमय पुरुषार्थ करण्या आम्हा दुःखी सेवकांचा"

"अनेक पुरस्कार प्राप्त करूनही क्रांती झाली का हो समाजाची, पण महानत्यागी बाबा जुमदेवजींनी उद्धार केला महारोगी, कोडी, दुर्धर आजार असणाऱ्यांची"

परिवर्तनाची ही नांदी तेजोमय ज्योत प्रज्वलित करून दाखवली.

"कलियुगात रोप लाविला सत्याचा, 

म्हणूनच आज वटवृक्ष झाला मानवधर्माचा 

उद्धार किती केले मानवांचे

विसरू नका हो बाबांच्या कृपेला

तत्व, शब्द, नियमाची दिले शिदोरी

आत्म्याच्या तिजोरीत जपा हो तिला".

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो. नमस्कार..!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ★ श्री. विनायक रोकडे: 9372330929

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- "सर्व सेवक -सेविका"

परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

2 comments:

  1. या लेखा मध्ये खूप सुंदर विचार दिले आहेत ..

    ReplyDelete