Followers

Tuesday, 9 March 2021

【"स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे"】नमस्कार.!!

 


        【"स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे"】

"मानवधर्माविषयी पूर्ण सखोल अभ्यास बाबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलेला आहे. यामुळे सेवकांनी बाबांच्या मार्गदर्शनातून दैवी शक्तीचा गुणांचा अभ्यास कसा करावा व बाबांची शिकवण आत्मसात करून सेवक कश्याप्रकारे आपले जीवनमान उंचावू शकतो?

                             【लेख स्पष्टीकरण】

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कुटुंबावर खूप दुःख होते. भुतबाधेने ते पीडित होते. समाजामध्ये व घरामध्ये असंतोष पसरल्यामुळे घरची परिस्थिती पहिल्यांदाच हलाखीची असून त्यात अजून भूतबाधा याचे दुःख असल्यामुळे चारही रस्ते बंद झाले होते. बाबांचे लहान भाऊ मारोतराव यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांच्यासाठी बाबा तांत्रिक-मांत्रिकांकडे जायला निघाले होते; परंतु एका साध्या रूपात एक व्यक्ती येऊन त्यांनी मारोतरावांना तीर्थ बनवून दिले. बाबा हनुमानजीच्या ह्या तीर्थाने मारोतरावानां बरे वाटले. त्यामुळे साध्या वेशात आलेल्या व्यक्तीवर बाबांनी विश्वास ठेवला व त्याने सांगितल्याप्रमाणे कार्य केले. बाबांनी जी विधी केली, ही साधी सोपी नव्हती. त्यातही बाबांची परीक्षा परमेश्वराने घेतली; परंतु बाबाने अगोदरच म्हटले होते की, "मरीन तर माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण कराल." आपले ध्येय मजबूत करून बाबांनी आपल्या कुटुंबाचे दुःख दूर केले.

बाबांच्या कुटुंबाची परिस्थिती बाबांनी चांगल्यापरीने अनुभवली होती. म्हणून त्यांनी समाजातील अवहेलना, दुःखी झालेल्या, भूत झालेल्या लोकांना, दुःखी-कष्टी मानवाला या मार्गाची दिशा दाखवली. आपल्या मार्गदर्शनात बाबांनी भगवंत गुणाचे आलेले अनुभव दैवी शक्ती मुळे त्यांना प्राप्त झालेले अनुभवाचे बोल ह्या सर्वांचा मार्गदर्शन बाबांनी आपल्या मार्गदर्शनातून केलेला आहे. परमेश्वर हा प्रत्येक आत्म्यात असून कर्म हा प्रधान आहे. म्हणून प्रत्येक सेवकाने बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करून नियम व मार्गदर्शिका याचे वाचन करून बाबांचे आदेश व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या आदेशाचे पालन करावे. 

बाबांनी चर्चा बैठक गावोगावी सुरू करून दिली आहे. त्या चर्चा बैठकीत जागृत भगवंत गुणांचे अनुभव प्रत्येक सेवक सांगत असतो. कुठे काही चुकलं तर मार्गदर्शिका नियमावलीप्रमाणे सेवक वागू शकतो. सुखाचे निवारण कसा करावा, योग कसा मागायचा, परमेश्वर प्रत्येक वेळी आपल्याला साथ कसा देतो आणि परमेश्वरी कृपा आपण कशी टिकवावी सर्व शिकवणीचा अभ्यास आपल्या चर्चा बैठकीतून होत असतो. आज इंटरनेट कॅम्पुटर, वेबसाईट युट्युब यावरून बाबांचे मार्गदर्शन ऐकून बरेच सेवक शिकलेले आहेत. अनेक व्हाट्सअप ग्रुप वरून चर्चा बैठक चालत राहते. ह्या सर्व ग्रुप वरून आपल्याला सदैव जागृत शक्तीचे गुण आत्मसात करता येतात व वेगवेगळी माहिती मिळते.

आपण जर आपला अर्धा तास वेळ घरातल्या मंडळींना किंवा बाहेरच्या मित्रमंडळीत परमेश्वरी गुण-गाण केले तर आपण चांगले काम करतो. म्हणजेच आपण भगवंत कार्याचा प्रचार आणि प्रसार करतो व त्यामुळे मनाला आनंद तर होतोच आत्मशक्ती प्रबळ होते. आपला आत्मविश्वास वाढून आपले आत्मबळ अशक्त करून, आपले ध्येय मजबूत झाले तर आपण आपल्या अनुभवातून दैवी शक्तीचा अनुभव दुसऱ्यांना सांगू शकतो. आपण स्वतः आपल्यापासून बाबांच्या नियमाचे पालन करायचे. कुटुंबातील लोकांना पालन करायला सांगायचे. थोडीफार चूक झाली तर प्रेमाने समजून सांगायचे. बाबांनी सर्वात मोठा मंत्र आपल्याला दिलेला आहे. राग आणू नये; पण आपण लहान मुलांवर, घरातील स्त्रियांवर, ज्येष्ठ व्यक्तींवर नेहमी राग काढत असतो. त्यामुळे त्यांचे आत्मबल कमी होते. म्हणून आपण आपली भाषा ही प्रेमास्वरूप असावी.

डोक्यावर बर्फाचा गोळा व जिभेवर साखर ठेवून आपण जर वागलो तर कुटुंबातच मानाचे स्थान तर मिळतेच; पण समाजामध्ये नक्कीच आपल्याला मानाचे स्थान मिळते. आपण आपल्या जीवनातच नाही तर आपल्या सभोवती असणाऱ्या समाजाला मार्गाची दिशा दाखवून आपले जीवनमान उंचावु शकतो. जागृत परमेश्वरी कृपेचा गुण आपल्याला आपल्यामध्ये टिकवून ठेवायचे आहेत तर, तत्व-शब्द-नियमाचे पालन करून स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.





1 comment:

  1. खूपच छान नमस्कार जी 🙏

    ReplyDelete