Followers

Tuesday, 27 July 2021

"मानवधर्मातील सेवकांचा त्याग" वरील विचार नक्की वाचन करा व जास्तीतजास्त सेवकांपर्यंत आठवणीने शेयर करा. नमस्कार

"बाबांनी आपल्याला मानवधर्मामध्ये त्याग करायला शिकविले, तर त्याग म्हणजे काय ? त्याग आपण आपल्या जिवनात कशाप्रकारे पार पाडतो आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय बदल होतो"?

                     【लेख स्पष्टीकरण】

त्याग म्हणजे समर्पण. आपल्या मार्गात त्यागाला विशेष महत्व दिले आहे. कारण काही चांगले मिळविण्यासाठी, काही वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो. 

★वाईट काय?  

तर, विविध व्यसन जे मानवी जीवनासाठी हानिकारक आहे ते नेहमीसाठी सोडणे, विविध वाईट विचार ज्याने मानवी जीवनाचा नुकसान होऊ शकते अश्या विचारांना कायमचे सोडणे.

★चांगले काय?

मानवी जीवनाचे सुख, मानवी जीवनाचा कल्याण, मनुष्याची आंतरिक शांती, ई.

तर, चांगले काय व वाईट काय हे आपणा सर्वांना चांगल्याप्रकारे माहितीये व त्याच्या अनुसरण आपल्या जीवनात कसा करावं हे विचार करण्याची सद्बुद्दी  परमेश्वराने सर्व मनुष्याला दिली आहे. फक्त त्या सद्बुद्दी चा वापर कसा करावा याचा योग्य दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.

मानवधर्मात जेव्हा सेवक कुणीही व्यक्ती प्रवेश करतो व त्यानंतर दुःख दूर झाल्यावर,समाधानी मिळाल्यावर मार्गाच्या नियमाप्रमाणे त्यागाचे कार्य करावे लागतात व १२ वर्षातून एकदा पक्क्या सेवकांना त्यागाचे कार्य करावे लागतात. तसेच काही विशीष्ट वेळी त्यागाचे कार्य करावे लागतात. परंतु फक्त त्यागाचे कार्य करणे म्हणजेच त्याग नाही.

या मार्गातील सेवकांना बाबांनी नेहमी सत्याची वागणूक देण्यास सांगितले आहे, मर्यादेचे पालन करून प्रेमाने राहण्यास सांगितले आहे. कारण या मार्गात येण्याअगोदर प्रत्येक सेवक हा कुठल्या ना कुठल्या दुःखाने ग्रस्त होता आणि त्या दुःखावर विजय मिळवण्याकरता सेवकाला आपल्या मनाची एकाग्रता पूर्ण करण्यास आपल्या आत्म्यातून त्याग करणे आवश्यक होते. जोपर्यंत आत्मा जागृत होत नाही तोपर्यंत दुःख दूर होत नाही याचा अनुभव आपण घेतलेला आहे.

आपल्याला जर कोणती गोष्ट मिळवायची असेल तर त्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो, ही गोष्ट जर मला हवी आहे तर मला नेमकं काय करावे लागेल आणि त्याबद्दल विचारांची देवाण-घेवाण इतरांशी करतोय.  सर्व केल्यानंतर जेव्हा जो योग्य तोडगा निघतो त्या माध्यमातुन आपण ती गोष्ट पूर्ण करतो.

बाबांनी सांगितले आहे, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख व समाधानी हवी असेल तर स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा. मनात कुठल्याही प्रकारचा मोह, लोभ निर्माण न करता मनावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे. तुमच्या चुकीच्या इच्छा, विचार या सर्वांना वेळेवर मूठमाती द्यावी लागेल.

त्याग केल्याने बरेचसे फायदे मानवाला होत असते कारण कुठल्याही गोष्टीबद्दल जागरूक असणे किंवा त्याबद्दल विचार करणे. त्या गोष्टीबद्दल तत्पर असणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण त्याग करतो त्यातून मिळणारा आनंदही आपल्यालाच मिळतो आणि या त्यागामुळे आपले जीवनमान उंचावते सुख समाधान प्राप्त होते आणि आपल्या जीवनाचे सोने झाले असे जाणवते. 

या मार्गात काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार अश्या मानवी मनातील सर्व विकारांचा त्याग करावा लागतो व एका परमेश्वराच्या चरणी मरून निष्काम कर्मयोगी बनून सत्कर्म करावे लागतात. त्यामुळे आपण परमेश्वर प्रिय मानव बनतो. आपले आचार-विचार शुद्ध बनतात व आपला जीवनाचा उद्देश सफल होतो म्हणजेच प्रपंच साधून परमार्थ साधल्या जातो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो. नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील लेख वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 24 July 2021

वरील लेख नक्की वाचन करा व जास्तीतजास्त शेयर करा. नमस्कार

▶ "मानवधर्माचे संस्थापक 'महानत्यागी बाबा जुमदेवजी' यांनी केलेल्या त्यागातून, समाजाला व सेवकांना काय प्रेरणा मिळाली"?

                     【लेख स्पष्टीकरण】

आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी लागला आहे व मनुष्य इतका व्यस्त झाला आहे की, त्याला स्वतः ला वेळ द्यालला वेळ नाही.

 तर, अश्या परिस्थीती मध्ये मनुष्य जगत आहे. अश्या जीवनात एक मनुष्य आपल्या गरजांचा व आपल्या सुखाचा  विचार न करता, मनुष्य संकटात येऊ नये या करिता अथक परिश्रम करतो. त्याग करतो व विविध मनुष्यांना विविध दुखातुन मुक्त ठेवण्यासाठी विनामूल्य कृपा वाटुन देतो. 

ते मनुष्य म्हणजे आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी. बाबांच्या या निष्काम कार्यामुळे समाज प्रेरित झाला आहे. त्यामूळे फक्त मार्गातील सेवकच नव्हे तर समाजातील इतरही बाबांच्या निष्काम कार्याची दाद देतात व आदर करतात.

 महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या त्यागामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख तर दूर झालेच पण त्यांनी त्याच बरोबर समस्त इतर  दुःखी कष्टी लोकांचे दुःख दूर करण्याचे महान असे कार्य केले.

त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखे आहे जसे,

🔘‌मानवतेचे खरा अर्थ

🔘‌एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग

🔘‌सत्य मर्यादा आणी प्रेमाचे महत्त्व

🔘‌जिवनाचे लक्ष्य म्हणजे मोक्ष प्राप्तीचा मार्ग

🔘‌व्यसनमुक्ती

🔘‌कर्मप्रधान जीवन

🔘‌परिवार नियोजन

यामुळे सेवकांचे आयुष्य तर बदलले पण जे इतकी वर्षे सरकार सुद्धा करू शकली नाही ते व्यसनमुक्ती आणी परिवार नियोजन ते बाबांनी करून दाखवून दिले व समाजाला नवीन दिशा दाखविली.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Tuesday, 9 March 2021

【"स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे"】नमस्कार.!!

        【"स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे"】

"मानवधर्माविषयी पूर्ण सखोल अभ्यास बाबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलेला आहे. यामुळे सेवकांनी बाबांच्या मार्गदर्शनातून दैवी शक्तीचा गुणांचा अभ्यास कसा करावा व बाबांची शिकवण आत्मसात करून सेवक कश्याप्रकारे आपले जीवनमान उंचावू शकतो?

                             【लेख स्पष्टीकरण】

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कुटुंबावर खूप दुःख होते. भुतबाधेने ते पीडित होते. समाजामध्ये व घरामध्ये असंतोष पसरल्यामुळे घरची परिस्थिती पहिल्यांदाच हलाखीची असून त्यात अजून भूतबाधा याचे दुःख असल्यामुळे चारही रस्ते बंद झाले होते. बाबांचे लहान भाऊ मारोतराव यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्यांच्यासाठी बाबा तांत्रिक-मांत्रिकांकडे जायला निघाले होते; परंतु एका साध्या रूपात एक व्यक्ती येऊन त्यांनी मारोतरावांना तीर्थ बनवून दिले. बाबा हनुमानजीच्या ह्या तीर्थाने मारोतरावानां बरे वाटले. त्यामुळे साध्या वेशात आलेल्या व्यक्तीवर बाबांनी विश्वास ठेवला व त्याने सांगितल्याप्रमाणे कार्य केले. बाबांनी जी विधी केली, ही साधी सोपी नव्हती. त्यातही बाबांची परीक्षा परमेश्वराने घेतली; परंतु बाबाने अगोदरच म्हटले होते की, "मरीन तर माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण कराल." आपले ध्येय मजबूत करून बाबांनी आपल्या कुटुंबाचे दुःख दूर केले.

बाबांच्या कुटुंबाची परिस्थिती बाबांनी चांगल्यापरीने अनुभवली होती. म्हणून त्यांनी समाजातील अवहेलना, दुःखी झालेल्या, भूत झालेल्या लोकांना, दुःखी-कष्टी मानवाला या मार्गाची दिशा दाखवली. आपल्या मार्गदर्शनात बाबांनी भगवंत गुणाचे आलेले अनुभव दैवी शक्ती मुळे त्यांना प्राप्त झालेले अनुभवाचे बोल ह्या सर्वांचा मार्गदर्शन बाबांनी आपल्या मार्गदर्शनातून केलेला आहे. परमेश्वर हा प्रत्येक आत्म्यात असून कर्म हा प्रधान आहे. म्हणून प्रत्येक सेवकाने बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करून नियम व मार्गदर्शिका याचे वाचन करून बाबांचे आदेश व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या आदेशाचे पालन करावे. 

बाबांनी चर्चा बैठक गावोगावी सुरू करून दिली आहे. त्या चर्चा बैठकीत जागृत भगवंत गुणांचे अनुभव प्रत्येक सेवक सांगत असतो. कुठे काही चुकलं तर मार्गदर्शिका नियमावलीप्रमाणे सेवक वागू शकतो. सुखाचे निवारण कसा करावा, योग कसा मागायचा, परमेश्वर प्रत्येक वेळी आपल्याला साथ कसा देतो आणि परमेश्वरी कृपा आपण कशी टिकवावी सर्व शिकवणीचा अभ्यास आपल्या चर्चा बैठकीतून होत असतो. आज इंटरनेट कॅम्पुटर, वेबसाईट युट्युब यावरून बाबांचे मार्गदर्शन ऐकून बरेच सेवक शिकलेले आहेत. अनेक व्हाट्सअप ग्रुप वरून चर्चा बैठक चालत राहते. ह्या सर्व ग्रुप वरून आपल्याला सदैव जागृत शक्तीचे गुण आत्मसात करता येतात व वेगवेगळी माहिती मिळते.

आपण जर आपला अर्धा तास वेळ घरातल्या मंडळींना किंवा बाहेरच्या मित्रमंडळीत परमेश्वरी गुण-गाण केले तर आपण चांगले काम करतो. म्हणजेच आपण भगवंत कार्याचा प्रचार आणि प्रसार करतो व त्यामुळे मनाला आनंद तर होतोच आत्मशक्ती प्रबळ होते. आपला आत्मविश्वास वाढून आपले आत्मबळ अशक्त करून, आपले ध्येय मजबूत झाले तर आपण आपल्या अनुभवातून दैवी शक्तीचा अनुभव दुसऱ्यांना सांगू शकतो. आपण स्वतः आपल्यापासून बाबांच्या नियमाचे पालन करायचे. कुटुंबातील लोकांना पालन करायला सांगायचे. थोडीफार चूक झाली तर प्रेमाने समजून सांगायचे. बाबांनी सर्वात मोठा मंत्र आपल्याला दिलेला आहे. राग आणू नये; पण आपण लहान मुलांवर, घरातील स्त्रियांवर, ज्येष्ठ व्यक्तींवर नेहमी राग काढत असतो. त्यामुळे त्यांचे आत्मबल कमी होते. म्हणून आपण आपली भाषा ही प्रेमास्वरूप असावी.

डोक्यावर बर्फाचा गोळा व जिभेवर साखर ठेवून आपण जर वागलो तर कुटुंबातच मानाचे स्थान तर मिळतेच; पण समाजामध्ये नक्कीच आपल्याला मानाचे स्थान मिळते. आपण आपल्या जीवनातच नाही तर आपल्या सभोवती असणाऱ्या समाजाला मार्गाची दिशा दाखवून आपले जीवनमान उंचावु शकतो. जागृत परमेश्वरी कृपेचा गुण आपल्याला आपल्यामध्ये टिकवून ठेवायचे आहेत तर, तत्व-शब्द-नियमाचे पालन करून स्वतःची प्रगती करून जीवनमान उंचवावे.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 28 February 2021

【"मार्गाच्या शिकवणीची अस्मिता जोपासणे"】नमस्कार..!

             【"मार्गाच्या शिकवणीची अस्मिता जोपासणे"】

▶ "आजच्या धोखाधाड़ी, छळ, कपट करून स्वार्थ साधनार्या समाजातील लोकांशी वागताना परमात्मा एक मानव धर्माचा सेवक म्हणून आपली वागणूक कशी असावी ज्यामुळे मार्गाच्या शिकवणीची अस्मिता जोपासली जाईल ?"

                               【लेख स्पष्टीकरण】

वरील विषय खऱ्या अर्थाने मानवाला माणुसकी शिकवीणारा आहे. आज कलियुगामध्ये मानवाला मानवाची ओळखच नाही. मानव हा स्वतःला सर्वेसर्वा समजून आपले जीवन जगत आहे. "ज्याचं करावं भल, तो म्हणतो माझंच खर" अशी आजची स्थिती आहे. म्हणून जगाच्या पाठीवर समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, छळ, कपट, धोखाधड़ी चे प्रमाण वाढले आहेत. जन्म देणाऱ्या आई-वडिलांना त्याची कदर नाही. तसेच क्षणभर सुखासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब केला जात आहे. या कलियुगात देवाच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. आपापसात भांडण शिवी-गाळी करणे, वेळ पडल्यास जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यास मागे पुढे पाहत नाही.

आपण मानव धर्माचे सेवक आहोत, त्यामुळे बाबांनी दिलेल्या शिकवणीचे पालन आपल्या जीवनात करने गरजेचे आहे. आज आपण पाहतो समाजाची दिशा उलट्या प्रवाहाने वाहत आहे; पण आपण सत्य, मर्यादा, प्रेम भगवंत गुणांच्या शब्दामध्ये बंधनात आहोत. म्हणून जशास तसे आपण होऊ शकत नाही. जागृत परमेश्वरी कृपा आपल्या सोबत सतत चोवीस तास असते. तेव्हा समाजातून सुद्धा कधी-कधी आपल्याला मानसिकता ढासळली जावी अशी वागणूक मिळते. त्यावर परमेश्वराजवळ आपण शब्द ठेवले तर परमेश्वर घडविणारा आहे. कारण, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने माणवासारखे आचरण दिले त्यांना परमेश्वर कुठेही कमी पडू देत नाही.

आवश्यक नाही की, समाजातील लोकांसोबत आपण सुद्धा तसेच वागू. आपण जर असे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? याचा विचार आपण करावा. मुर्खा बरोबर मुर्ख होण्यात काहीच उपयोग नाही. त्याच्या सोबत वाईट व्यवहार केल्यास, उलट त्याचा परीणाम स्वतःलाच भोगावा लागतो. 

आपला "मानव धर्म" हा केवळ एक आहे आणि आपल्या बाबांनी सर्व सेवकांना समान शिकवन दिली आहे. या शिकवणीचा भान ठेवुन आपण वागावे. बाबा जीवनात नेहमी इमानदारीने वागले, बाबांनी म्हटले आहे की, "इमान भगवान है" तसेच बाबांनी सेवकांना इमानदारी शिकवली आहे. म्हणून मानवधर्माचा सेवक इमान सोडू शकत नाही व सोडल्यास दुःख भोगावे लागते. आपण जर सत्याने चालत आहोत, तर इतरांना सफाई देत बसत राहण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवुन आपले कार्य करावे. समाजातील लोकं चांगल्या लोकांना नाव ठेवतात आणि वाईट लोकांना सुद्धा नावे ठेवतात; परंतु या मार्गात सदैव दैवी शक्ति जागरूक आहे, त्यामुळे आपण कोणते काम करत आहोत, जागृत दैवी शक्तीचे लक्ष आहे. आपण केलेल्या कार्याचा लेखा - जोखा हा परमेश्वरा जवळ आहे. मग याची चिंता कशाला? चांगल्या कार्याचं फळ हा योग्य मिळतो.

सर्वांना माहित आहे, हा मार्ग "कर्म प्रधान" आहे. जसे कर्म तसे फळ मिळते. जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करावे आणि आपले कर्म सुधारण्याचा प्रयत्न करत राहावे. यातच मानव धर्मातील सेवकांचा फायदा आहे. या मार्गातील सेवकांनी निस्वार्थी भावनेने सेवा करावी आणि जीवन सुखी जगावे. बाकी देणारा परमेश्वर आहे. याची अपेक्षा करू नये. "सत्याचा विजय" निश्चितच आहे.

भगवान के घर मे देर है, मगर अंधेर नहीं! म्हणुन समाजातील वाईट गोष्टीला बळी न पडता आपली वागणुक योग्य ठेवावे. प्रेमाच्या शब्दाने दुश्मन सुद्धा सुधारतो. त्यामुळे आपली वागणूक ही नेहमीच ईमानदारीची ठेवावी. त्यामुळे आपल्या मानव धर्माची अस्मिता जोपासली जावू शकतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 14 February 2021

"इस मार्ग के सेवक, सेवकोंको गलती से छुड़ाते है" हा लेख आवर्जून वाचन करा, नमस्कार.!

【"इस मार्ग के सेवक, सेवकोंको गलती से छुड़ाते है"】

महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या मार्गदर्शनानुसार,

"इस मार्ग के सेवक, सेवकोंको गलती से छुड़ाते है, यही परमार्थ का कार्य है। लोग, लोगों को छुडाते है यही सही परमार्थ है"। बाबांच्या या मार्गदर्शनाला आपण कशाप्रकारे समजतो।

                          【लेख स्पष्टीकरण】

हम सभी सेवक जानते है कि, बाबाने हमे हर समय, योग्य शिक्षा दी है, औऱ दैवी शक्ति के अनुभव मार्गदर्शन के माध्यम से विस्तार पूर्वक समजाये है।

आजका विषय यह हमें सीख देता है कि, जिस तरह हम दुखी थे, सुख की पहचान करने हेतु इधर उधर भटकते रहे थे। जब किसी सेवक के माध्यम से इस मार्ग की जानकारी मिली औऱ हम सुखमय जीवन का आनंद लेने लग गए।

महान धर्मगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजीने कड़ी मेहनत और बलिदान के माध्यम से मानव धर्म की स्थापना की। इस मानवधर्म मे, केवल एक ईश्वर है जो इस सृष्टि का निर्माता और दुनिया का कथन है। महान धर्मपरायण बाबा जुमदेवजीने अपने घर की देखभाल की और एक भगवान को प्राप्त किया। इस धर्म मे कर्म बहुत महत्वपूर्ण है। ईश्वर हमे उसी तरह से फल देता है जैसे हम कर्म करते है।

जब हम इस मार्ग के सेवक बने तो, बाबा द्वारा दिये नियम अनुसार जीवन व्यतीत करने लगे। गृहस्थी जीवन में सेवक कभी कम ज्यादा कर देता है, इसलिए नियमों से चूक जाता है। इसका फल भी स्वयं ही पाता है। इस परिस्थिति में कोई अन्य सेवक आकर हमे अपनी गलती का एहसास करवाते है, एक नई उम्मीद हमे देते है। जिससे हमारा आत्मबल मजबूत होने में सहायत होती है।

जब कोई व्यक्ति अपने कर्मो के कारण अनजाने में कुछ करता है, तो वह दुखी हो जाता है और नोकर को इसके परिणाम भुगतने पड़ते है; लेकिन अगर नोकर गलती को याद करता है और माफी माँगता है, तो उसका दुःख दूर हो जाता है। इस तरह, यहां तक कि नोकर भी एक दूसरे को छोटी और बड़ी गलतियों से बचा सकते है क्योंकि कोई देख रहा है कि हम क्या कर रहे है। अगर नोकर गलती करता है और हम उसे अपनी ऑखों से देखते है और उसे याद दिलाते है, तो वह गलती नही करेगा। इसलिए वह पीड़ित नही होगा, और वह फिर से गलती नही करेगा।

जब किसी जगह सेवक जाते है तो, वहाँ उन्हें कोई दुःखी कष्टी व्यक्ति मिले तो वे मार्ग के प्रति जानकारी देते है। बाबा द्वारा किये गए मार्गदर्शन विस्तार से समझाते है। जिससे वह अन्य व्यक्ति मार्ग में आनेसे सुखी हो जाता है। जब सेवक किसी अन्य व्यक्ति को मार्ग के प्रति जानकारी देते है, तो किसी भी प्रकार का मूल्य लेते नही, और ना ही उस समय उनके यहां एक कप चाय पीते है।

क्योंकि जब हम किसी दुखी व्यक्ति को मार्ग की जानकारी देते है, तो उस समय हमारे भीतर निष्काम सेवा भाव रहता है। जिसे परमार्थ का सत्य कार्य कहा जाता है। औऱ सदैव यह सेवा भाव मन मे रखकर पीड़ितों की सहायत करनी चाहिए।

इसलिए बाबा कहते है।

"इस मार्ग के सेवक सेवकों को गलती से छुड़ाते है, यही परमार्थ का कार्य है, लोग लोगों को छुडाते है यही सही परमार्थ है"।

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 13 February 2021

"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी" हा लेख नक्की वाचन करा, नमस्कार..!

 【"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी"】

"तुझं आहे तुझपाशी, तरी तू भुललाशी" ही म्हण मानवधर्मातील सेवकांवर कशाप्रकारे लागू होते.

                                 【लेख स्पष्टीकरण】

वरील विषय खूप सुंदर असून सेवकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. चराचरात वास करणारी चैतन्यमयशक्ती, सृष्टी निर्माण करणारे आकारात नाही; पण चैतन्यमय शक्तीचे गुण दाखवणारे महान बलशाली, शक्तिशाली परमेश्वर प्रत्येक आत्म्यामध्ये वास करतो. आम्ही अनेकामध्ये होतो तेव्हा मानवाने तयार केलेली कलाकृती देव म्हणून पुजत होतो. अनेक देवी देवतांचे पूजन करीत होतो. त्यांच्या पायावर लोळण घेत होतो; पण कोणीही खरा भगवंत दाखविला नाही. कारण ह्या समाजामध्ये सत्य जर दाखविले तर पोट भरत नाही व लुबाडण्याचा साधन फक्त स्वतःमध्ये बसलेला स्वार्थ आहे.

रामायणात दोन माणसे होती. विभिषन आणि दुसरी कैकयी सगळ्यांनाच माहित आहे. विभिषन रावणाचा भाऊ, आणि कैकई सावत्र असली तरी रामाची आईच, विभिषन रावणाच्या राज्यात राहूनही बिघडला नाही. कैकई रामाच्या राज्यात राहूनही सुधारली नाही. चिखलात राहून कमळ फुलतो आणि दूध पाजूनही साप विषच ओकतो. अमृताचा वेल निंबावर जातो तेव्हा संगत गुण मिळाल्यावर कडू बनतो. म्हणून संगत चांगली तर विचार चांगले आणि चांगल्या विचारांमध्ये विकार येत नाही हे सर्व साधुसंत यांना माहिती होते; परंतु कोणीही समजाला जागवू शकले नाही.

दुःख कुणाच्या वाट्याला येत नाही, तर सगळ्यांच्याच वाट्याला येते. गरीब-श्रीमंत, साधुसंत यांच्याही जीवनात दुःख येते. सर्वांनाच दुःखाचा सामना करावा लागतो. फरक फक्त एवढाच आहे. काही लोक सामना करतात आणि काही जणांना दुःख कवेत घेते; पण आम्हाला आमच्या दुःखा विषयी चैतन्यमय जागृती शक्तीचे अनुभव आमच्या "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांनी आम्हाला जागृत करून सांगितले आहे. इतकेच नव्हे तर भगवंत शक्ती जागृत आहे; म्हणून दुःखाला घाबरू नका आणि सुख आले तरी मार्गात यायचा पहिला दिवस विसरू नका. जसा सुखाचा आदर करतो तसेच दुःखाचे स्वागत करून सुख आणि दुःख जीवनामध्ये आपण परमेश्वराला कधीही विसरायचे नसते.

"महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" आम्हाला जागृत केले. सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीवांमध्ये आत्मा आहे. अनेक आत्मा मिळून एक परमात्मा तयार झाला आहे. हे बाबांनी आम्हाला अनुभवाने परमेश्वरी गुण दाखवून अनुभवायला सांगितले आहे. आम्ही ते अनुभवतो. "महानत्यागी बाबा जुमदेवजींनी" आम्हाला स्वावलंबी बनविले आहे. तत्व, शब्द, नियमाची शिकवण आम्हाला दिलेली आहे. शब्दावर जागृत परमेश्वरी कृपा आम्हाला सोपवून दिलेली आहे. बाबांनी निष्काम सत्य कार्य केले. वचनामध्ये परमेश्वराला बांधले आहे म्हणूनही परमेश्वरी कृपा आजही ही शब्दावर कार्य करत आहे; पण मानव हा अति हुशार आणि बुद्धिवान आहे. म्हणून आज सुखी झाल्यावर सेवक ज्यामुळे सुखी झाला त्याच तत्व, शब्द, नियमांना विसरत चालला आहे. 

"तुझं आहे तुझंपाशी, तरी तु भुललाशी" खरं आहे. बाबांनी आम्हाला सर्व शिकविले तरीपण आम्ही आजही थोडेफार दुःख आले तर मार्गदर्शकाकडे धाव घेतो किंवा एखाद्या त्यागी सेवकाला तीर्थ बनवून मागतो. कारण आमचा आत्मविश्वास आमच्यावरचं नाही. बाबांनी आम्हाला विश्वासाची भक्ती दिली आहे. बाबांनी ध्येय मजबूत केले तेव्हा बाबांना परमेश्वर भेटला. आम्हालाही विश्वासाची भक्ती करून ध्येय मजबूत करून आपल्या दुःखाचे निवारण करतांना आपले आत्मबळ, आपला आत्मविश्वास, आपले ध्येय मजबूत करून परमेश्वराजवळ योग मागणे आहे. 

आपल्याच विश्वासाची, ध्येयाची भक्ती आहे. आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वर वास करतो. आपला आत्मा परमेश्वराचा निवासस्थान आहे. तरीपण आपण इकडे तिकडे भटकतो. आपले मन विचलित करतो, सुखाच्या शोधात वणवण भटकतो.

आपला मार्ग कर्मप्रधान आहे. आपले कर्म चांगले करू तर आपल्याला नक्कीच यश येईल. जेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण हा विचार करत होतो की, आपण दुखामधून केव्हा दूर होणार आणि सुखाची लाट केव्हा येणार! म्हणून सेवकांचे ध्येय मजबूत असले तर मन विचलित होणार नाही. ज्या वेळेस मन विचलित होते त्यावेळेस मानवाला स्वतःजवळ असलेली परमेश्वरी कृपा आठवत नाही. कुठेतरी त्याचे कर्म चुकलेले असतात म्हणून सेवकांनी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाला जागून परमेश्वराचा कधीही विसर पडू नये. बाबांनी परमेश्वराला आकारात नाही दाखविले; पण दैवी शक्तीच्या गुणात आपण सर्व सेवक अनुभवले आहे. बाबांचे शब्द आहेत, "दैवी शक्तीला समोर ठेवून सेवकांनी कर्म करावे." या मार्गदर्शनाला आपण कधीही विसरू नये. आपला परमेश्वर आपल्या आत्म्यात आहे. चैतन्य जागृत आत्मा निर्मळ मनाने, पवित्र विचारांनी, शुद्ध शरीराने आपल्याजवळ कार्यरत राहतो, म्हणून परमेश्वरी कृपा सदैव टिकवण्यासाठी आपण कुठल्याही अहंकाराला बळी न पडता, बाबांच्या आदेशानुसार कर्म करावे. हाच अर्थ आजचा विषय सर्व सेवकांना सांगून जातो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. ◆ जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:- परमात्मा एक मानवधर्म परिवार【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर अवश्य भेट द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 7 February 2021

"भगवंत कृपेचा योग" हा लेख आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर आवर्जून वाचन करा .

【"भगवंत कृपेचा योग"】

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्याला जातात, तरी त्या सेवकांना योग मिळण्यात खूप अडचणी येत असतात. या उलट काही सेवक कमी प्रमाणात भगवत कार्याचा लाभ घेतात, तर त्यांना खूप लवकर चांगला योग मिळतो? असे सेवकांसोबत का घडत असेल?

   【लेख स्पष्टीकरण】

आजचा विषय खूप छान असून सेवकांसाठी खूप महत्वाचा सुद्धा आहे. जेव्हा सेवक चर्चाबैठक मध्ये जातात तेव्हा सेवकांनी  आपले पूर्ण लक्ष परमेश्वराच्या चर्चा बैठक मध्ये असणे आवश्यक आहे. कारण कधी कधी आपल्या हातानी एखादी चुक झाली, तर आपण त्या चुकीची सोडवणूक करु शकताे. कारण बाबाने आपल्याला एक चित्त, एक लक्ष आणि एक भगवान मानायला सांगितले आहे. तेव्हाच आपल्याला योग मिळत असताे. कारण परमेश्वराला माहीत असते की, कुणाला काय पाहिजे आहे.

परमेश्वर आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. आपल्याला पाहिजे ते परमेश्वर देतात म्हणून जेव्हाही आपण हवनकार्यात असलो तेव्हा आपण विनाकारण गप्पा गाेष्टीत वेळ घालविणे चुकीचे आहे. जेव्हा चर्चा बैठक सुरु असते तेव्हा, काही सेवक विनाकारण बाहेर जाणे, विनाकारण बडबड करणे आणि मोबाईल वर गप्पा करणे, चॅटींग करणे हे अतिशय चुकीचे आहे. हे सर्व परमेश्वराला दिसत असते. त्यामुळे परमेश्वर त्यांना याेग देत नाही. सेवक म्हणतात की, "आम्ही चर्चा बैठकीत जाऊन सुध्दा आम्हाला याेग मिळत नाही, दुःख दुर हाेत नाही". त्यामुळे नाराज हाेतात.

आपण जेव्हा आपला वेळ परमेश्वराला देऊ तर, परमेश्वर सुध्दा आपल्या मनाेकामना पूर्ण करतात. म्हणून आपण  परमेश्वराला आपला वेळ देने आवश्यक आहे. जेव्हा इतर सेवक आपले अनुभव सांगतात तर, ते मनापासुन ऐकणे आवश्यक आहे. कारण आपण मनापासून ऐकले तर ते, आपण आपल्या परिवारात सांगून आपल्या चूका दुरुस्त करू शकतो. त्यासाठी भगवत कार्याच्या वेळी एक चित्त, एक लक्ष व एक भगवान असणे आवश्यक आहे. बाबांनी आपल्याला सांगितले आहे की, "हा मार्ग कर्मावर आधारित आहे, जसे आपण कर्म करू त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल." त्यासाठी बाबांनी सेवकांना मार्गदर्शन तर केलेच, त्यासोबत बाबांची शिकवण तत्व, शब्द, नियम हे प्रत्येक सेवकाला दिलेले आहे.

काही सेवक नेहमी चर्चा बैठकीत व हवन कार्यात उपस्थित असतो. त्यावेळी स्वयम् भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात. आपले सदगुरु महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित असतात व आपण सर्व सेवकांची आत्मा मिळून एक परमेश्वर त्याठिकाणी निर्गुण निराकार असतात. चैतन्यमय कृपा जागृत शक्ती उपस्थित असते. त्या ठिकाणी आपण अनुभवाचे बोल भगवंताचे गुण कमी ऐकतो व एकमेकांची भेट व गोष्टी जास्त प्रमाणात करतो. कुणी सेवक कंटाळा आला म्हणून कुठे पानटपरीवर, हॉटेलमध्ये बसलेले असतात. जे अनुभव ते ऐकत असतात त्यावर ते टिंगल बाजी करत असतात. हवन कार्यात, भगवत कार्यात, चर्चा बैठकीत फक्त देहाने उपस्थित असतात. त्यांचे मन कुठेतरी भटकत असते; परंतु असे चुकीचे आहे.

ज्याप्रमाणे एक म्हण आहे, "देव देवळात, चित्त खेटरात" त्याप्रमाणे नश्वर देह घेऊन चर्चा बैठकीत बसून अंतरात्मा मध्ये अनेक द्वंद विचार मनात आलेले असतात, ते चुकीचे आहे.  आपल्यावर असलेले दुःख दूर केव्हा होतील, होतील की नाही? परमेश्वराला आपली काळजी लागेल की नाही? हा विचार मनात लागलेला असतो; पण सेवकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळसा हातात धरला तर हात काळा होतो जर, निखारा हातात धरला तर हात जळतो. त्याचप्रमाणे कलुषित विचाराने आत्म्याचे शुद्धता न होता अशुद्ध विचाराची त्या ठिकाणी भावना निर्माण होते.

भावना निर्माण झाली की, शब्द निघतात शब्दावर परमेश्वर उभा आहे म्हणून आपल्याला योग प्राप्त होत नाही. काही सेवक प्रपंच चालवत असताना काही अडचणीमुळे खूप कमी कार्यक्रमात सहभाग घेतात. एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी मनाची एकाग्रता साधून परमेश्वरावर आपला पूर्ण भार सोपवून देतात. म्हणजेच आपले ध्येय मजबूत करून ते त्या चर्चा बैठकीत भगवंत कार्यात बसले असतात. त्यांच्यामध्ये ध्येयपूर्तीसाठी तत्व, शब्द, नियमाची तिजोरी ही फार मोठी देन असते व ती जमवण्यासाठी , अनुभवाचे गाठोडे बांधण्यासाठी, परमेश्वरी गुणाने आत्मशुद्धी करण्यासाठी चर्चा बैठक, भगवत कार्यात ते बसलेले असतात.

आपल्यावर दुःख येते, त्यावेळी परमेश्वराला आपण म्हणतो की, "परमेश्वरा माझे दुःख दूर कर"; पण आपण आपल्या कर्माने चुकलो असतो. ती चूक आपल्याला शोधावी लागते. त्या चुकीची आपल्याला क्षमा मागावी लागते. जेव्हा आपले शब्द परमेश्वराजवळ सुटतात तेव्हाच आपल्याला योग्य तो योग मिळतो. उदाहरणार्थ:- पेपर देताना विद्यार्थी प्रश्न सोडवित असतो. प्रश्नाचे उत्तर लिहित असतो; पण शिक्षक मात्र शांत व कर्तव्यनिष्ठ असतो. त्याचप्रमाणे, आपण जे कर्म करत असतो त्याची तपासणी भगवंत करीत असतो. 

आपल्या कर्माचे शब्द आपण सोडावीत नाही तोपर्यंत आपल्याला योग मिळणार नाही.

असे खूप वेळा होते. प्रत्येक वेळी माणसाच्या गर्दीत शिकायला मिळते असे नाही. आयुष्यातले काही क्षण आवर्जून एकांतात एक चित्त, एक लक्ष, एक भगवंत अशी एकाग्रता साधून जर आपण एकांत घालविला तर आवर्जून आयुष्यातले काही क्षण आपला संवाद फक्त स्वतःशिच करणे योग्य आहे. इथूनच आपल्या चूका दुरुस्त करण्याची संधी आपल्यात येते व आपले आत्मबळ वाढते. भूतकाळाकडे शिकण्याची आणि भविष्य निर्माण करण्याची खरी शक्ती म्हणजे आपले कर्म आहे. हे कर्म साध्य करण्यासाठी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाचा वापर आपण आपल्या जीवनात करायलाच पाहिजे. आपण जसे कार्य करू तसे आपल्याला फळ मिळेल आपल्याला जर दुर्धर आजाराविषयी योग साधायचा आहे. त्यासाठी आपल्याला  कठिण कार्य करावे लागते.

 लोभ, अहंकार, राग, द्वेष, मोह या सर्वांचा त्याग करून आपल्याला शुद्ध विचाराने परमेश्वराचे कार्य करावे लागतात. तरच आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतो. असे सेवकांसोबत का घडत असेल? तर ह्या साठी बाबांनी दिलेले तत्व, शब्द, नियमाचे पालन केले तर, कुठलेही दुःख राहणार नाही. हे बाबांचे शब्द आहेत. जो सेवक तत्व, शब्द, नियमाने वागेल त्याच्या पायाला काटा हि रूतणार नाही आणि हे शब्द मानव धर्मात खरे झालेले आहेत. सत्य, मर्यादा, प्रेमाने घराची आखणी केली, तत्वाचे पालन केले व नियमांचे अनुसरणानुसार वर्तवणुक ठेवली तर आपल्याला परमेश्वर कुठेही कमी पडू देणार नाही.