Followers

Tuesday, 12 May 2020

["दैवी शक्ति पर अविश्वास, मतलब दुःखो का वास, अहंकार कि माया में उन्मत हो अज्ञान में चले दैवी शक्ति कि परीक्षा कि और"]




               [प्रकाशित दिनांक:- १२ नोव्हेंबर २०१६]
                     【अनुभव क्रमांक: १७२】

                          【"मेरा अनुभव"】

【"दैवी शक्ति पर अविश्वास, मतलब दुःखो का वास, अहंकार कि माया में उन्मत हो अज्ञान में चले दैवी शक्ति कि परीक्षा कि ओर"】

मेरा नाम 'शीतल गणेशजी उरकुडकर' है। आज मैं 'मेरा अनुभव' इस अनुभव मालिका मे मार्ग मे आने के बाद आया हुआ दैवी शक्ति का दुसरा अनुभव पेश कर रही हूँ।

महानत्यागी बाबा जुमदेवजीने हमे विश्व की सबसे अनमोल दैवी शक्ति प्राप्त करके दी है। भगवान ने यह भी बोला है की, "मानव यह बेईमान है", उनकी बात सही भी है। भगवान के कहने के मुताबिक उसमेसे मै एक मानव हूँ और बेईमान हूँ। क्योंकि जब हम इस मार्ग मे आये, तो हमारे सारे दुःख दुर हो गये। मम्मी-पापा एक भगवान को बहुत मानते थे, आज भी मानते है और हमेशा मानते रहेंगे। 

लेकिन मै इतनी नासमझ थी की, शैतान और भगवान के बिच का अंतर नहीं समझ पायी। हमारे घर के पुरे दुःख दुर हो गये, हमारे घरका पपी (कुत्ता) था वो भी ठिक हो गया, पापा की दारू भी छुट गयी और घरमे सुख-समृद्धी भी आ गयी। लेकिन मै भगवान पर विश्वास नहीं करती थी। मुझे लगता था की ये सब ढोंग है, फालतू है। मै इस महान जागृत कृपा को समज ही नहीं पायी थी। 

एक दिन मै ऐसेही सोच रही थी की, ये सब लोग पागल है जो पुजा वगैरे करते है, ढोंग है ये सब। मै ऐसा मन ही मन मे बोल ही रही थी, तभी अचानक मेरे पेट मे दर्द होने लगा और मुझसे वो दर्द बिल्कुल भी बर्दाश्त नहीं हो रहा था। तभी मैने 'भगवान बाबा हनुमानजी' और 'महानत्यागी बाबा जुमदेवजी' से मन ही मन मे विनंती करते हुवे बोली की, "अगर भगवान आप सच मे हो, ये दैवी शक्ति जो बाबा जुमदेवजीने प्राप्त की है वो सच मे है, अगर ये सब सच है, तो मेरा दर्द आप अभी के अभी दुर किजिये"। मै कभीभी इस भगवान को नहीं भुलुंगी, सदैव याद करूँगी। 

बाबा ने मेरी पुकार सुन ली और मुझे पेट दर्द से मुक्त किया। भगवान बाबा हनुमानजी, मैने इस दैवी शक्ति पर शंका करके बहुत बडी भुल की बाबा। लाखो लोगोंका जीवन आपने सुखी बनाया, दुःखोसे भरी जिंदगी थी, उन्हे खुशियोंका समुंदर दिया और मै अज्ञानी लडकी इस कृपा को समझ ही नहीं पायी। मुझसे ज्यादा अज्ञानी तो शायद ढुंढके भी नहीं मिलेगा। लेकिन उस दिन से जब मुझे सिंख मिली, मुझे भगवान बाबा हनुमानजी और महानत्यागी बाबा जुमदेवजी पर पुरा विश्वास हुआ और मेरे बाबाने मुझे अंधेरेसे उजाले मे लाया। 

इसलीये, मै सभी सेवकोंसे अनुरोध करती हूँ की, मैने जो गलती की, वो कोई और ना करे। महान त्यागी बाबा जुमदेवजीने प्राप्त की हुई शक्ति जागृत है और वो अपने गुणोसे हमे दिखाई देती है। 

लिखने में भुलवश कोई गलती हुई है तो "भगवान बाबा हनुमानजी" एंव "महानत्यागी बाबा जुमदेवजी" इनसे क्षमा प्रार्थी हूँ।

नमस्कार...!

सेवक:- शीतल गणेश उरकुडकर
पता:- गट क्र.८, नागपुर
सेवक क्रमांक:- ४२९११
मार्गदर्शक:- श्री. किर्तीवानजी जिभकाटे
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान नगर, नागपूर

अपने इस युवा सेवकों के ग्रुप से जुड़ने हेतु एंव अपने परिवार में परमेश्वरी कृपा के साक्षात्कार का अनुभव "मेरा अनुभव" इस अनुभव मालिका में प्रकाशित करने हेतु हमें निम्नलिखित मोबाईल नंबर पर Whats App msg करें। ★जीवन पाटील: 7020000823

टिप:- यह पोस्ट कॉपी ना करें, अपितु ज्यादा से ज्यादा मात्रा में शेयर करें।

सौजन्य:-
"सभी सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकों का ग्रुप】

"एडमिन सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार, फेसबुक पेज.

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


प्रकरण क्रमांक: (१७) "सर्वेसर्वा परमेश्वर"




                   "मानवधर्म परिचय पुस्तक"  (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती'  प्रकरण क्रमांक (१७) 
   
                        【"सर्वेसर्वा परमेश्वर"】

महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपेचा मानवाला परिचय करून दिल्यामुळे या मार्गाचे अनेक उपासक झालेत. त्यामुळे बाबांच्या शिष्यमंडळींची संख्याही वाढू लागली. बाबा त्यांना नेहमी उपदेश करीत असत. भेटीला येणाऱ्या शिष्यांकडून कसल्याही प्रकारची फी किंवा गुरुपूजा ते स्वीकारीत नाहीत. बाबा निष्काम भावनेने जनसेवा करीत आहेत. त्यामुळे बाबांकडे येणाऱ्या शिष्यांची सारखी रीघ असते.

१९६४ सालची ही घटना आहे. बाबांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचे नाव मनो उर्फ महादेव आहे. तो बी. ई. (मेटलर्जी) प्रथम वर्षाला शिकत असतानाची ही गोष्ट आहे. बाबांकडे मार्गदर्शनाकरिता शिष्यमंडळी रोज सकाळपासून सतत येत असत. तसे बाबांचे घर लहानच होते. तेथे सर्व प्रकारची वेगवेगळी व्यवस्था करणे अशक्यच होते. त्यामुळे बाबा ज्या खोलीत सेवकांना मार्गदर्शन करीत असत, त्याच खोलीत एका कोपऱ्यात या मनोचे अभ्यासाकारिता टेबल ठेवले होते. मनो रोज तेथेच अभ्यास करीत असे. बाबांचे सतत मार्गदर्शन, सेवकांची होणारी गर्दी यामुळे त्याचे लक्ष अभ्यासात लागत नव्हते. त्याच्या अभ्यासात दररोज काहीना काही अडथळा निर्माण होत होता. तो बाबांना सारखा म्हणायचा, "बाबा आपण मानवांना परमेश्वराबद्दल मार्गदर्शन करता पण भगवान कुठे आहे? कोण भगवान आहे? परमेश्वर कोणीही नाही. आपण मार्गदर्शन करता ते सर्व व्यर्थ आहे. मानव हाच खरा कर्मकर्ता आणि उपभोक्ता आहे. सर्व काही मानवच करतो व तोच घडवतो. त्यामुळे मानव हा सर्वेसर्वा आहे. आपण उगीच या गरीब, भोळ्या बाभड्या लोकांना फसवत आहात." तेव्हा बाबा त्याला समजावत होते की, मानव फक्त कर्मकर्ता आहे आणि त्याचे फळ देणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वर सर्वेसर्वा आहे. इतके समजावूनही तो समजत नव्हता आणि आपलेच तत्त्वज्ञान सांगत होता. बाबांनी खूप विचार केला. पण त्याला ते कधीही अपशब्दाने बोलले नाहीत. उलट नेहमी समजावत होते. तुझ्याकडून जेवढा अभ्यास होईल, तेवढाच कर. माझा भगवंत तुला काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या मार्गदर्शनापासून तुला कोणताही त्रास होणार नाही किंवा तु अभ्यासात मागे राहणार नाहीस. भगवंत तुला नेहमी साथ देईल, याची मी तुला खात्री देतो.

भगवंताविषयी घरात एवढ्या घडामोडी घडून देखील त्याला याबद्दल काहीच वाटत नाही हे बघून बाबांना दुःख होत होते, तरी ते समंजसपणा दाखवून शेवटी असा विचार करीत की, त्याचे विचार त्याच्याजवळ राहू द्यावे आणि आपण आपले कार्य सुरू ठेवावे. परंतु घरचे वातावरण बिघडू नये याचीही दक्षता ते घेत असत. त्यामुळे दोघांत कधीही अबोला निर्माण झाला नाही.

भगवंताला काहीतरी घडवायचे होते. मनोच्या मनातील अहंकार नाहीसा करावयाचा होता. म्हणून त्याने घडामोडी केल्या. त्याच्या मनात या मार्गाबद्दल तिरस्कार निर्माण केला व तो खूप वाढू दिला.

एके दिवशी तो सायंकाळी सहा वाजताचा सिनेमा पाहून आला. जेवण करून नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करून झोपला. त्याला झोपेत स्वप्न पडले. स्वप्नात त्याला दिसले की, त्याचा विठ्ठल राऊत नावाचा मित्र भेटायला आला आहे. त्यावेळी तो अभ्यास करीत होता. त्याच वेळेस एक भजन मंडळ घराच्या बाजूच्या गल्लीतून आले आणि समोर असलेल्या हनुमानजीच्या देवळात गेले. त्याच सुमारास बाबांच्या घरी मार्गदर्शनाकरीता दहा, बारा लोक आले होते. दोन मित्रांची चर्चा झाल्यावर त्याचा मित्र निघून गेला. त्यानंतर लोक मात्र बसूनच होते. बाबा भजन मंडळीबरोबर देवळात निघून गेले होते. तेव्हा स्वप्नातच तो आलेल्या त्या लोकांवर खूप रागावला आणि त्यांना म्हणाला, "तुम्ही कशाला बसले आहात ? तुमचे इथे काहीच काम नाही. तुम्ही जा आपल्या घरी." हे ऐकून जमलेले लोक आपापल्या घरी निघून गेले. त्या रागाच्या भरात त्याचे डोळे चढले होते. स्वप्नातच त्याला त्याची काकू सौ. सखुबाई (श्री. मारोतराव यांची पत्नी) घरून येताना दिसली. ती त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाली, "महादेव तुझे डोळे लाल का दिसतात?" त्याच वेळी महादेवने तिला विचारले, "काकू, माझे बाबा कुठे आहेत?" तेव्हा ती उत्तरली, अजून तुझे वडील बाहेरून घरी आलेले नाहीत. तेव्हा तो घरुन बाहेर आला आणि अंगनात खाटेवर बसुन वडिलांची वाट बघु लागला. हे सर्व त्याला स्वप्नातच दिसले. तेवढ्यात त्याला जाग आली. त्याच्या अंगात १०४ डिग्री ताप होता. तो उठून पाणी प्यायला आणि विचार करु लागला कि, मी सिनेमा पाहुन आलो तेव्हा चांगला ठणठणीत होतो आणि आता एकाएकी असे का घडले? असा विचार करीतच पाणी पिऊन परत झोपला. पुन्हा स्वप्नचक्र सुरू झाले, कारण परमेश्वराला त्याला काहीतरी शिकवायचे होते. 

त्याला स्वप्नात असे दिसले की, तो खाटेवर बसला असुन भजन मंडळी भजन आटोपुन समोरच्या देवळातुन बाहेर पडून आपापल्या घरी निघुन गेली, परंतु बाबा घरी आले नाहीत. स्वप्नातच त्याला बरे वाटत नव्हते. तो हळूहळू देवळासमोर गेला. देवळात जाताना रस्त्यातच त्याची प्रकृती खुपच खराब झाली, त्यामुळे त्याला चालणेही कठीन झाले, तरी मोठ्या हिंमतीने व कष्टाने तो कसातरी देवळात गेला. हनुमानजीच्या मुर्तीसमोर उभा राहुन तो खुप रडू लागला. त्याचे रडणे थांबेना. रडतरडतच तो म्हणु लागला, "बाबा हनुमानजी माझा त्रास दुर करा." तेवढ्यातच त्याचे बाबाही तेथे आले आणि त्याच्या पाठीवर थोपटुन म्हणाले, "महादेव, तु घरी जा. तुला काहीच होत नाही" आणि तेवढ्यात त्याचे स्वप्न भंग झाले. तेव्हा त्याच्या अंगात ताप नव्हता. त्याला बरेही वाटत होते. प्रकृती पुर्वी सारखीच वाटत होती. हा काय चमत्कार असावा ? असा स्वत:शीच विचार करुन तो पुन्हा झोपला. 

तो नेहमी प्रमाणे सकाळी झोपुन उठला. त्यावेळेस त्याला थोडा ताप होताच. प्रातर्विधी उरकुन चहा घेताना त्याने बाबांना वरील स्वप्नाची पुर्ण हकीकत सांगितली. ताप आल्यासारखे वाटते असेही त्याने सांगितले. तेव्हा बाबांनी त्याला डॉ. झोडेकडे जाऊन औषध घ्यायला सांगितले. तो डॉक्टरकडे जाऊन आला. त्याने औषध घेतले आणि त्याने बाबांच्या सल्ल्यानुसार घरीच आराम केला. त्या दिवशी तो बाहेर गेला नाही.

त्या दिवसापासून त्याच्या मनात परमेश्वराबद्दल भक्ती निर्माण झाली आणि परमेश्वर ही काहीतरी अलौकिक शक्ती असुन मानव सर्वेसर्वा नाही, तर परमेश्वरच सर्वेसर्वा आहे हे तो मानू लागला.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
"सर्व सेवक -सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】


🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


Monday, 11 May 2020

【स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला】

                 प्रकाशित दिनांक: ११ नोव्हेंबर २०१९
                      अनुभव क्रमांक:(१७१)

                       【"माझा अनुभव"】

【स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला】

माझे नाव 'आकाश धनराजजी भोंगाडे' आहे. आज मी 'माझा अनुभव' या अनुभव मालिकेत  माझ्या वडिलांना मार्गात आल्यानंतरचा प्रथम अनुभव सादर करीत आहे.

माझे वडील व्यवसायाने शेतकरी आहे. लहानपणापासून ते आतापर्यंत ते शेतीचेच काम करत आहेत. एवढ्या दिवसांचा शेतीचा अनुभव आणि आगळे-वेगळे होणारे पिकावरील रोग यांचा त्यांना पुरेसा अभ्यास आहे. तसेच शेतीतील काही प्रश्नांवर उत्तर द्यायला ते नेहमी तत्पर असतात. आमच्याकड़े शेती असल्याने आमचं कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. आमची शेती कोरडवाहू आहे आणि आम्हाला नेहमी सिंचन कालव्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते. पावसाचे पाणी कधी वेळेवर येते किंवा नाही याची काही शाश्वती नाही.

आमच्या कडे धानाची शेती होती. नुकतेच धानाचे रोप शेतात उगवले होते. पाणी उशिरा आल्याने धान उशिरा पेरला त्यामुळे रोप लहान होते. त्यानंतर १५ ते २० दिवसांत रोवणी करणे गरजेचं असते. वास्तविक रोपाची उंची झाल्यावर आपल्याला त्याची शेतात रोवणी करावी लागते आणि लोकांची रोवणीला सुरुवात झाली होती. आमच्या शेतातील रोप लहान असल्यामुळे रोवणी करायला जमत नव्हते. 

माझे काका जे मार्गामध्ये नाही, त्यांनी रोपांच्या वाढीसाठी एका औषधीमध्ये दारू मिसळवून त्याची रोपावर फवारणी केली त्यामुळे रोपाची वाढ झपाट्याने झाली व ते रोवणीसाठी तयार झाले. ही प्रक्रिया त्यांनी माझ्या वडिलांना सांगितली. मात्र दारूला हात लावणे आपल्याला जमत नाही म्हणून वडिलांनी त्यास नकार दिला पण जर दुसऱ्याच्या हाताने दारूची फवारणी केली तर चालेल असं त्यांचं मत होतं. 

ठरल्याप्रमाणे औषधी मध्ये दारू मिसळवून त्याची फवारणी आमच्या शेतातील रोपावर करण्यात आली. मात्र घडले उलटेच, दोन ते तीन दिवसांत संपूर्ण रोप भाजल्यासारखे झाले होते व त्यांचे सडणे सुरु झाले होते, रोपाची वाढ होणे तर दूरंच पण वाढ खुंटलेली होती. हे जे काही घडलेले होते त्याच्या मागची चूक माझ्या वडिलांना आधीच माहित होती. त्यांनी सरळ मार्गदर्शकांचा रस्ता गाठला. चुकीमुळे घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली, त्याची माफी मागितली. मार्गदर्शकांनी आम्हाला सात दिवसांचे माफीचे कार्य दिले. त्या सात दिवसांत सडलेल्या रोपाला अंकुर फुटले, ते मोठे झाले नंतर त्याची रोवणी करण्यात आली. त्या दिवसानंतर असल्या प्रकारचा प्रयोग कधीही करण्यात आला नाही व सर्व बरोबर होत गेले. स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याच्या हातून दारूचा उपयोग हा खूप महागात पडला.

लिहिन्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" ला क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक:- आकाश धनराजजी भोंगाडे 
पता:- भंडारा
सेवक क्रमांक:- ११८९४
मार्गदर्शक:- श्री. वैरागडे गुरुजी
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर     
आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
◆ मंगेश संग्रामे:- 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.


प्रकरण क्रमांक: (१६) "पाच नियम"



                       "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
                 'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (१६) 
   
                                     "पाच नियम"



महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्म या मार्गातील सेवकांना भगवत् प्राप्ति करीता तसेच निष्काम कर्मयोग साधण्याकरीता, चार तत्व, तीन शब्द, आचरणात आणण्याकरीता सांगितले आहे. सेवकांनी ते आचरणात आणल्यावर, सुरुवातीला त्यांना या भगवंत् कृपेचा पूर्ण लाभ मिळाला परंतु कालांतराने काही सेवकांच्या कुटुंबात पुन्हा दुःख निर्माण होऊ लागले. त्यांच्या संपूर्ण भावना नाहीशा झाल्या नव्हत्या. त्यामुळे ते भावनेच्या आहारी जात होते. त्यांच्या मनात शंकाकुशंका येत होत्या. या मार्गात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. नवीन धर्म असल्यामुळे त्यांची एकता व संघटना असणे आवश्यक होते.
  
बाबांच्या निवसस्थानी शनिवारी होणाऱ्या निराकार बैठकीत बाबा विदेह अवस्थेत असताना त्यांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले की, या मार्गात येणारे सेवक बुद्धिहीन आणि श्रमक आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात परिश्रमाचा लाभ मिळत नाही. म्हणून बाबांनी त्यांना जीवनात चालन्याकरिता, त्यांची गृहस्थी उंच आनण्याकरीता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरीता बाबांनी विदेहावस्थेत असतांना बंधनाच्या रुपात त्यांना आचरणात आणण्याकरिता खालील  पाच नियम दिलेत.
   १) ध्येयाने एक परमेश्वर मानणे.
   २) सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात तसेच कुटुंबात कायम करणे.
   ३) अनेक वाईट व्यसने बंद करणे.
    (दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, पटाची होड़, कोंबड्याची काती, चोरी करने, खोटे बोलने, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मूलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.)
   ४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे.
   ५) आपले कुटुंब मर्यादित ठेवणे. 
 याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळावेळी पालन करणे. 

     वरील नियमाचे मानवाने पालन केल्यास त्याला जीवनात सुख, शांती व समाधान मिळते आणि त्यांचे लक्ष्य फक्त एका भगवंताकडे असते. त्यांच्या मनात इत्तर भावना निर्माण होत नाहीत. वाईट भावनेचा नाश होतो. अंधश्रद्धा नाहीशी होते. शंकाकुशंका नष्ट होतात. अनेक वाईट मार्गानी जाणारा पैसा वाचतो आणि त्याच्या आयुष्याची प्रगती दिवसेंदिवस होत जाते. त्याचे मनोधेर्य वाढते. वाईट व्यसन बंद झाल्यामुळे  शारिरिक सुख मिळते. कुटुंबात सत्य, मर्यादा व प्रेम निर्माण होते. जीवनात अनेक पूजा बंद केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये निर्माण होऊन तो आत्मप्रचिती देतो. आत्मानुभव येतो. त्यामुळे आत्मबल वाढतो आणि भगवंत  जवळ राहतो दुःख निर्माण होत नाही. त्यामुळे मानवाला आपले भविष्य उज्वल बनविता येते.
 
लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार....

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
        "सर्व सेवक -सेविका"
"परमात्मा एक मानवधर्म परिवार"
       【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Sunday, 10 May 2020

["फिरलो दारोदारी तरी नाही झाली दूर माझी बिमारी, आलो एका भगवंताचा दारी, क्षणात दूर झाली बरी न होणारी बीमारी"]

【"माझा अनुभव"】अनुभव क्रमांक: (१६९) प्रकाशित दिनांक: ०९ नोव्हेंबर २०१६

【"फिरलो दारोदारी तरी नाही झाली दूर माझी बिमारी, आलो एका भगवंताचा दारी, क्षणात दूर झाली बरी न होणारी बीमारी"】

माझे नाव 'सुरेंद्र रहांगडाले' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात माझे आई-वडील, आणि मी असे एकूण ३ सदस्य होते. आम्ही अत्यंत दुःखी होतो. मी २०१० मध्ये नोकरीवर लागलो व कॉम्प्युटर ऑपरेटर या पदावर रुजू झालो. एक वर्ष माझा चांगला गेला आणि नंतर मला डोळ्यांचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांकडे गेलो तर तिथेही आराम मिळाला नाही आणि पिलिया (jaundice) झाला, असे निदर्शनात आले. डॉक्टरांकडे औषधोपचार केला, पण आराम मिळत नव्हता. नंतर मी पिलियाचे औषध घेतले व त्याने मला आराम मिळाला. परंतु तीन महिन्यानंतर पुन्हा मला पिलिया झाला. तेव्हा मी वैदांकडे पिलिया झाडायला गेलो. माझे दोन वर्षं असेच निघाले. वर्षातुन चार ते पाच वेळा पिलिया व्हायचा. असेच सतत दोन-तीन वर्ष औषधोपचार करणे आणि पिलिया झाडणे सुरू होते. नंतर मी २०१४ ला दुसऱ्या नोकरीवर लागलो व नागपूरला स्टोअर इंचार्ज या पदावर दोन महिने काम केले.

पुन्हा पिलिया (jaundice) झाला आणि मला नौकरी सोडावी लागली. मला काही कळेनासे झाले की वारंवार असे का घडत आहे. नंतर पुन्हा दुसऱ्या कंपनीत नोकरीला लागलो आणि पुन्हा ३ महिन्यानंतर पिलिया आणि गालाच्या बाजूला गाठ यायची. मी डॉक्टरकडे औषधोपचार केला, पण आराम मिळत नव्हता. कारण डॉक्टरांना त्या गाठीमागचे मुख्य कारण मिळेना. तेव्हा शेजारचे म्हणायचे की, तू ज्या खोलीत राहतोस तिथे यापूर्वी दोन व्यक्ती मृत्युमुखी झालेले आहेत, त्यांना पण गळयाला गाठ यायची. पण या गोष्टींकडे मी लक्ष दिले नाही. माझा त्रास आणखी वाढला, तेव्हा मी गावी परत आलो आणि गोंदियाला डॉक्टरी उपचार केला. परंतु, तिथे पण नैराश्यच हाती आले. मी शेवटी मरण्याच्या स्थितीमध्ये होतो आणि वैदाकडे गेलो. त्यांनी मला सांगितले की, तुला ३ वर्षांपासून पिलियाचा त्रास आहे आणि तू ज्या खोलीत राहतो, त्या खोलीत दोन माणसांना पण गळयात गाठ येऊन ते मृत झालेले आहे. मी घाबरलो आणि त्या वैदाने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर मला १५ मिनिटांत आराम मिळाला. तर मी दर पंधरा दिवसांत त्यांच्याकडे जायचो व पंधरा दिवसांत पुन्हा तोच त्रास व्हायचा. घरी पूजा केली, हवन केले, पण पुन्हा पंधरा दिवसात तोच त्रास. पैसे खर्च झाले परंतु त्या वैद्यांची शक्ती कामी नाही आली.

मी नागपूरला आलो आणि घर बदललं, तरीपण पुन्हा तोच त्रास. त्यावेळी वैदाकडे जाऊन आणि पैसे खर्च करायचो आणि या परिस्थितीने मी बेजार झालो. तेव्हा मी घरी म्हटले की, "मी नोकरी सोडत आहे व घरी बसत आहे. मला सतत येणे-जाणे परवडत नाही".
मग मी घरी आलो, तर एके दिवशी आमच्या घरासमोर राहणारे परमात्मा एक मार्गातील सेवक श्री. अशोकजी बिसेन यांनी मला मार्गाबद्दल माहिती दिली आणि आमची खूप वाईट परिस्थिती असल्यामुळे आम्ही कुटुंबाचे एकमत करून दुसऱ्या दिवशी श्री. अशोकजी बिसेन यांच्यासोबत मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी सर्व परिस्थिती विचारली आणि मार्गाची रूपरेषा सांगितली. आम्हाला फक्त आराम पाहिजे होता म्हणून सर्व करायला तयार होतो. म्हणून आम्ही २०१५ ला दिवाळीच्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गात प्रवेश केला आणि साधे कार्य सुरु केले व मला दोन ते तीन महिन्यांमध्ये आराम मिळाला. 

धन्य आहे ही दैवी कृपा व महानत्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांनी मला मरणाच्या पातळीवरून वाचवले आणि आज मी सुखी-जीवन जगतोय.

लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक :- सुरेंद्र रहांगडाले
पत्ता :- मु. इंदोरा, पो. करटी, ता. तिरोडा, जि. गोंदिया
मार्गदर्शक :- श्री. भोजराजजी पारधी
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. 7057624579

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करू नये, त्यापेक्षा  जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

प्रकरण क्रमांक: (१५) "आईची ममता" मातृदिनानिमित्त विशेष


                     "मानवधर्म परिचय पुस्तक" (मराठी)
          'सुधारित पाचवी आवृत्ती' प्रकरण क्रमांक: (१५) 
   
                               "आईची ममता"



महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि तेव्हापासुन ते भगवंताचा प्रति लोकांना जागृत करण्याचे कार्य निष्काम भावनेने करीत आहेत. या कृपेचा लाभ अनेकांना मिळत असल्यामुळे या मार्गात अनेक सेवक येत आहेत. त्या सर्वांना अनेक प्रकारचे फायदे उदाहरणार्थ, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक तसेच पुत्रप्राप्ती, इत्यादी गोष्टींचा लाभही त्यांना मिळत आहे. त्याचबरोबर अनेक चमत्कारिक अनुभव येत आहेत. बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावरही भगवंत त्यांची कधी कधी परीक्षा घेतात. त्यातील एक प्रसंग आहे.

सन १९५१ च्या एप्रिल महिन्याची ही घटना आहे. बाबांच्या जेष्ठ वहिनी श्री. बाळकृष्णरावांची पत्नी श्रीमती सीताबाई ह्यांना स्वप्नात बाबा हनुमानजी यांनी आकाशात असतानाच्या स्थितीमध्ये दर्शन दिले आणि आकाशवाणी केली की, सेवकांच्या (बाबांच्या) पाच भावांचा कुटुंबात जी बाई गरोदर आहे त्या बाईला मुलगाच होणार आहे आणि त्याचे आयुष्य फक्त तीन महिन्याचे राहणार आहे. त्यानंतर तो इहलोक सोडून जाईल.

या वेळेस श्री. नारायणराव यांच्या पत्नी सात महिन्यांचा गरोदर होत्या. ती बाई नऊ महिने पूर्ण झाल्यावर १ जुलै १९५१ रोजी प्रसृत झाली आणि त्यांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. भविष्यवाणी खरी ठरली. श्री. नारायणरावांकडे येणारे हे पहिलेच अपत्य आणि तेही पुत्र असल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाळण्यात घालण्यात आले. गरीब परिस्थिती असूनही मुलाचे बारसे थाटात पार पडले. मुलगा दिवसेंदिवस वाढत होता. छान खेळत होता त्याला कधी ताप आला नाही, सर्दी झाली नाही, दूध पीत नाही किंवा सारखा रडतो अशी कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तो सर्वांचा आवडता होता. त्याचे कौतुकही तितकेच होत होते. तो तीन महिन्याचा होईपर्यंत त्याला काहीही त्रास झाला नाही.

'भगवंताची लीला न्यारीच' या म्हणीप्रमाणे झालेल्या भविष्यवाणीप्रमाणे तीन महिने पूर्ण झाले आणि दुसऱ्यादिवशी तो एकाएकी आजारी पडला. त्याचे शरीर एकदम थंड पडले. शरीराची हालचाल बंद झाली. डॉक्टरांच्या उपायाला यश येत नव्हते. सकाळची वेळ होती. त्यामुलाचे वडील नारायणराव त्याला घेऊन महानत्यागी बाबा जुमदेवजींकडे आले. वडील खुप रागात होते. ते मुलाच्या मोहमायेत गुंतले होते. त्यांचाबरोबर कुटुंबातील इतर मंडळी पण गोळा झाली. त्यांनी त्या मुलाला बाबांच्या समोर खाली झोपावले. ते रागारागाने म्हणाले, आपल्या घरात बाबा (भगवंत) आहेत तर हा मुलगा जगायला पाहिजे. तरच खरा परमेश्वर आहे. अन्यथा परमेश्वर प्राप्ती खोटी आहे. बाबांना प्रमेश्वराबद्दलचे असे उद्गार ऐकून खूप वाईट वाटले. त्यांचासमोर फार मोठा प्रश्न उपस्तिथ झाला. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे असे विचार योग्य नाहीत असे त्यांना वाटले.

ते निराकार अवस्थेत आले आणि कुटुंबातील लोकांना उद्देशून म्हणाले, "बाबा हनुमानजीने उस बाई को बताया कि बच्चा तीन महिनेका आयुष्य लेकर आनेवाला है। अब उसका तीन महिने का आयुष्य पुरा हुआ है। इसे जाना है। अब इसे किसका आयुष्य दे।" अणि आदेश दिला की, "परिवारके लोग एक कतार मे खडे हो जाओ। और जीसकी इच्छा हो वह कहे की मेरा आयुष्य इसे दे दो" त्याप्रमाणे सर्व जण पुरुषमंडळी आणि स्त्रिया हे एका ओळीत वेगळेवेगळे उभे राहिले. सगळीकडे स्तब्धता होती. सर्व विचारमग्न झाले. कोणाच्याही तोंडून शब्द निघाला नाही की, माझे आयुष्य या मुलाला द्या. कारण सर्वांना आपआपले प्राण प्रिय होते. प्रत्येकाला वाटत होते की, आपण खूप जगावे आणि हे स्वाभावीकही आहे. काही वेळाने त्या मुलाच्या आईने बाबांना विनंती केली की, बाबा मला विचार करायला दोन तासांची मुदत द्या. बाबांनी तिला दोन तासांची मुदत दिली. निराकार बैठक संपली. मुलगा तेथेच पडून राहिला.  

दोन तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी निराकार बैठक झाली. मुलगा तसाच अचेतन स्थितीत पडला होता. सर्वजण जमले होते. बाबा निराकारमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना म्हणाले, परिवारके लोग सुनो, बच्चेको आयुष्य मिल गया. त्यानंतर पुढील काहीच सांगितले नाही. बाबांचे शब्द त्यांच्या मुखकमलाव्दारे बाहेर पडताच  त्या अचेतन मुलाने एकदम जोरात रडायला सुरवात केली. तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या मुलाला कोठून आयुष्य मिळाले याबाबतीत बाबांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. अशा प्रकारे "भगवंताची लीला न्यारींच" ही म्हण बाबांनी सिध्द करून दाखवली आणि परमेश्वर खरा आहे हे पण दाखवून दिले.

पंधरा दिवसांनंतर त्या मुलाची आई अचानक आजारी पडली. औषधेपचार  केले. घरच्या मंडळींनी भगवंताला विनंती केली. पण तिचा काहीही उपयोग झाला नाही. त्या बाईने जी दोन तांसाची मुदत मागितली होती, त्यामागील कारण, तिची इच्छा काय होती हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. शेवटी काही दिवसांनी  ती परमेश्वराला प्रिय झाली. ती हे जग सोडून गेली. मुलगा अजूनही कायम आहे.

तेव्हा बाबांनी सांगितले की या बाईने आपले आयुष्य तिच्या मुलाला दिले. तिने प्रत्यक्षात सर्वांसमक्ष जरी सांगितले नव्हते तरी तिने भगवंताला तशी विनंती केली होती. यावरून "आईची ममता" किती महान (थोर) आहे, तसेच एकाचे आयुष्य संपवून ते दुसऱ्यास देता येते हे याउदाहरणावरून या मार्गाने सिध्द केले आहे. खरोखरच हा मार्ग (मानवधर्म) इतरांच्या तुलनेने "जगावेगळा मार्ग" आहे.

कायम असलेल्या मुलाचे नाव अशोक असुन आज तो चाळीस वर्षाचा आहे. तो सुखी आणि समाधानी असुन सर्वगुण संपन्न आहे.

लिहिण्यात काही चुक भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार..!

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

■ वरील माहिती मानवधर्म परिचय पुस्तक (मराठी) सुधारित पाचवी आवृत्ती मधील आहे.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती.
जीवन पाटील: 7020000823

सौजन्य:-
        "सर्व सेवक -सेविका"
"परमात्मा एक मानवधर्म परिवार"
       【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.

Saturday, 9 May 2020

【"दारूच्या व्यसनाधीनतेने गृहस्थी जीवनाची हानी झाली, शेवटी मानवधर्मातच सुंदर जीवनाची दिशा मिळाली"】


【"माझा अनुभव"】अनुुुभव क्रमांक: (१६६) प्रकाशित दिनांक: ०७ नोव्हेंबर २०१६

【"दारूच्या व्यसनाधीनतेने गृहस्थी जीवनाची हानी झाली, शेवटी मानवधर्मातच सुंदर जीवनाची दिशा मिळाली"】

माझे नाव 'नारायण कृष्णरावजी मंडलेकर' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.

मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात ५ सदस्य होते. त्यात माझे आई-बाबा, माझा मोठा भाऊ (नामदेव), माझा लहान भाऊ (कैलाश) आणि मी. आमच्या कुटुंबात माझ्या बाबाला आणि माझ्या मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. ते पूर्णपणे दारूच्या व्यसनात डुबलेले होते. त्यामुळे आमची घरगृहस्थी अत्यंत खालावलेली होती. त्या वेळी माझे बाबा चौकीदारीचे काम करायचे आणि जेवढे पैसे मिळायचे, तेवढे पूर्ण दारूच्या व्यसनात उडवायचे. माझ्या मोठ्या भावाचे लग्न २००२ मध्ये झाले. तो वेगळा निघाला. त्यानंतर माझ्यावर घरची पूर्ण जीम्मेदारी वाढली आणि सोबतच मला पण दारूचे व्यसन लागले. माझ्या बाबाला दारूच्या व्यसनामुळे पैसे अपुरे पडायचे. या दारूच्या व्यसणामुळे घरची परिस्थिती नाजूक होऊन गेलेली होती. माझ्या आईला खूप विचार यायचा. त्यानंतर आईने माझ्यासाठी मुलगी बघायचे ठरवले. त्यावेळी बाबांनी आमच्यासाठी काहीही कमवून ठेवलेले नव्हते. या परिस्थितीत लग्न करायला घरी पैसे नव्हते. मित्रांचा सहारा घेऊन जवळपास ३०,००० रुपये गोळा केले आणि मी २४ मे, २००६ ला माझे लग्न झाले. मी माझ्या प्रपंचाला सुरवात केली. लग्न झाल्यानंतर मी माझे दारूचे व्यसन बंद केले. आमचा संसार चांगला सुरू झाला. 

त्यानंतर २२ मार्च, २००७ या वर्षी माझी मोठी मुलगी जन्माला आली. आम्ही सव्हा महिन्यानंतर बारसे केले. दुसरी मुलगी २३ सप्टेंबर, २००९ या वर्षी जन्माला आली. माझा प्रपंच वाढला. त्यावेळी माझ्या घरी कमवते वेक्ती मी एकटाच होतो. माझे बाबा स्वतःचे व्यसन पूर्ण करण्याकरिता फक्त कमवायचे. घरी मुळीच पैसे द्यायचे नाही. माझ्यावर माझ्या लहान भावाचा भार पडलेला होता. त्या वेळी तो शिकत होता. त्या परिस्थितीत मी मोटर लाईन मध्ये नोकरी करत होतो. तिथे पैसे भरपूर मिळायचे. कालांतराने माझ्या मोठ्या मुलीला मोठं पाठवली. त्यानंतर माझ्या त्याच मुलीला घालत दिली. पहिल्या दिवशी तिने उलटी केली, त्या वेळी असे वाटले की, खाण्यामध्ये काही कमी-जास्त झालं असणार. फार काही विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी परत उलटी केली. त्यानंतर मी तिला हिंगणा या गावी वागउमरी या ठिकाणी घेऊन गेलो. तिथे एका बाईच्या अंगात देवी यायची. तिने माझ्या मुलीची घालत वगैरे काढून दिली. तिला घरी घेऊन आलो, त्यानंतर मी विचार केला की, इतके देवी-देवतांचे करून सुद्धा आराम नाही, कोणाचा साथ नाही. त्यानंतर मी खूप गोंदळून गेलो. या त्रासामुळे माझे हळू हळू दारूचे व्यसन सुरू झाले. त्या वेळी मला मोटर लाईनचा पैसा दिसायचा. माझे दारूचे व्यसन खूप वाढले. जे मी कमावले होते, ते सर्व गमावले होते. माझ्या व्यसणामुळे माझी सर्व इज्जत गेलेली होती. मला माझे नातेवाईक कोणीही ओळखायचे नाही.

कालांतराने माझ्या आईची प्रकृती खूप खराब झाली. डॉक्टरांनी सांगितले की, तुमची आई जास्त दिवस जगणार नाही. जेवढी सेवा होते, तेवढी सेवा करा. त्यानंतर माझ्या आईला घरी आणले आम्ही २ महिने सेवा केली. त्यानंतर माझी आई माझ्यातून निघून गेली. दिवसेंदिवस घरची परिस्थिती आर्थिक, मानसिक रित्या गंभीर होत होती. माझे दारूचे वेसन खूप वाढलेले होते. मी खूप परेशान झालो होतो. काही दिवस असेच दारूचे व्यसन खूप करत गेलो आणि या दारूच्या व्यसनात घरी खूप भांडण करत होतो. माझे घर पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलेले होते. मला नेहमी चिडचिड व्हायची. त्यावेळेस माझ्या लहान भावाने मला खूप समजावले. त्यावेळी मी खूप विचार केला. मी नेहमी माझ्या मावस सासच्याकडे नेरला या गावी जात होतो. तर त्यांच्याकडे 'परमात्मा एक' सेवा होती. नेरला या गावी बाबांचे भवन सुद्धा होते. त्या गावी गेल्यानंतर माझे मावस सासरे मला त्या भवनामध्ये नेहमी न्यायचे, ते माझ्या लक्षात आले आणि मी स्वतः आठ दिवस विचार केला. असा विचार केला की, आपला थारा कुठेही लागणार नाही, फक्त परमात्मा एक मार्गातच लागणार. कारण घरचा कमवणारा मी एकटाच होतो आणि मी निघून गेलो तर माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त होणार. मी माझ्या पत्नीला म्हटले की, आपण मार्ग स्वीकारू. पण माझी पत्नी म्हणाली की, तुम्ही दारू सोडणार नाही, तर मी म्हटले की मी पक्का विचार केला आहे आपण मार्ग घेऊया.

आम्ही पतीपत्नीने पक्का विचार केला आणि सकाळी नऊ वाजता गावातील मार्गदर्शक रामभाऊजी सावरकर यांच्याकडे गेलो होतो. तर काकू बोलल्या की काकाजी झोपले आहेत, तुम्ही दहा वाजता या. ती वेळ माझी कामाची वेळ होता तर मी तिथून निघून घरी आलो. त्यानंतर मी कामाला गेलो आणि जिथे काम सुरू होते, ते घर सेवकाचे होते. त्यांचे नाव शालिकजी राऊत होते. राऊत काकजींच्या पत्नीला मी सांगितले की, मला मार्ग घ्यायचा आहे. त्या काकू बोलल्या की चांगली गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी म्हटले की, तुम्ही सायंकाळी या आणि काकाजी सोबत बोलून घ्या. त्यानंतर मी काकाजी सोबत बोलून त्यांनी मला मार्गाबद्दल रूपरेषा सांगितली आणि त्यांच्यासोबत गावातील सेवक मधुकरजी पोटभरे यांच्याकडे त्यांनी नेले. मधुकर काकाजीनी सुद्धा मार्गाबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांनी म्हटले की, तू उद्याला सकाळी पूर्ण परिवार घेऊन माझ्याकडे ये आपण मार्गदर्शक काकाजीकडे जाऊ. मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सर्व तयार झाले पण माझा लहान भाऊ तयार नव्हता कारण, तो कुठल्याही देवाला मानत नव्हता. त्यावेळी त्याला सुद्धा दारूचे व्यसन लागलेले होते. माझा भाऊ बोलला की, मी तुझ्या घरी दारू पिऊन येणार नाही, पण मी मार्ग सुद्धा घेणार नाही. त्यानंतर मी माझ्या बाबांचे विचार घेतले आणि आम्ही पतिपत्नी, माझ्या दोन मुली आणि माझे बाबा आम्ही गावातील सेवक मधुकरजी पोटभरे यांच्याकडे गेलो. तिथे आम्हाला गावातील सेवक विठ्ठलजी कुंभलकर, भगवानजी सरोदे हे मिळाले आणि आम्ही या सेवकांबरोबर कान्हानचे मार्गदर्शक उमरावजी बांते काकाजीकडे गेलो.

त्यानंतर काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले तर मी सांगितले की, मला दारूचे खूप व्यसन आहे आणि माझ्या मुलींचे बरोबर वागवत नाही. काकाजींनी सांगितले की, ठीक आहे, तू तुझ्या घरची साफसफाई कर आणि अकरा दिवसाचे कार्य सुरु करून भगवंताची ज्योत तुझ्या घरी लाव आणि  त्यावेळी मी फक्त काकाजीकडून १३ फेब्रुवारी, २०१२ या दिवशी शब्द घेऊन आलो होतो आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की, अगरबत्ती घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या घरी देवी-देवतांच्या फोटो वगैरे भरपूर होते. ते विसर्जन करण्याकरता तीनदा सायकलने कन्हान नदीवर चक्कर मारली आणि तिसर्‍या वेळी जातांनी विचार केला की, आता मला अगरबत्ती, तेल घ्यायचे आहे. मी सर्व विसर्जन केल्यानंतर थैली उचलली तर मला थैली भारी लागायला लागली. थैली भारी का लागते? म्हणून मी थैलीमध्ये बघितले. थैलीमध्ये पितळ्याच्या मुर्त्या होत्या, कारण मी प्रत्येक नवरात्रामध्ये वगैरे कुठे यात्रेला वगैरे गेलो तर पितळेच्या मुर्त्या घेत होतो. त्यानंतर ती थैली घेऊन भांडे वाल्याच्या दुकानात गेलो आणि त्या दुकानवाल्या दादाला म्हटले की, बापू ह्या पितळेच्या मुर्त्या घे आणि तुला जे द्यायचे आहे ते तू देऊ शकते. दुकानवाला दादा बोलला की, किती पैसे देऊ? मी म्हटले की, तुला जे द्यायचे आहे ते तू दे. त्या दादानी मला १६० रुपये दिले. त्या पैशाने मी अगरबत्ती, कापूर, तेल घेतले आणि १४ फेब्रुवारी २०१२ या दिवशी पासून मी कार्याला सुरुवात केली. ज्या दिवशी भगवंताची पहिली झोप लागली त्या दिवशी असे वाटायचे की, घरी काहीही नसतांना भरभराट आहे. ११, २१ अशाप्रकारे कार्याला मी सुरुवात केली.

त्यानंतर जवळपास चार महिने झाले होते. माझे बाबांनी आमच्या सोबत चांगले कार्य केले. त्यानंतर त्यांची मनस्थिती बदलली आणि त्यांनी दारूचे व्यसन केले. त्यावेळी मला विचार आला की, माझ्या बाबांनी दारूचे व्यसन केले तर मी आता काय करावं? मी काही सेवकांना सांगितले. त्यावेळेस मी माझ्या बाबांना पाणीसुद्धा दिले नाही. त्यानंतर कार्यकर्ता काकाजींना सांगितले. काकाजींनी म्हटले की, दारूचे व्यसन केले असल्यावर त्यांना काहीही खायला-प्यायला द्यायचे नाही. कार्यकर्ता काकांजींच्या शब्दाचे मी पालन केले. मी माझ्या बाबाला आठ दिवस जेवण, पाणी काहीही दिले नाही. काही दिवसानंतर माझ्या बाबांनी म्हटले की, यानंतर मी दारूचे व्यसन करणार नाही. त्यावर मी माझ्या बाबांना भगवंताला माफी मागायला लावली. माझ्या बाबांनी भगवंताला माफी मागितली आणि माझ्या कार्याला पुन्हा सुरुवात केली.

असेच दिवस निघत गेले आणि जवळपास आम्हाला एक वर्ष झाला, त्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला. तसेच माझ्या मुलीच्या प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला. तर असे का बरं होत आहे, म्हणून मी माझ्या भावाला विचारले की, तू दारुचे व्यसन करून घरी येतोय का? तू मला शब्द दिला होता, मी दारू पिऊन तुझ्या घरी येणार नाही. त्यावर माझा भाऊ बोलला की, मी दारू पिऊन येत नाही. त्या वेळी माझा भावाचा सांभाळ मीच करत होतो. मी विचार केला की, माझ्या भावाचे लग्न करून द्यावे, जेणेकरून आपला संसार सांभाळणार. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. मी विचार केला की, आपल्याला शेवटी कर्जबाजारी होणे आहे, तर यावर्षी याचे लग्न करून द्यायचे. ज्यावेळी लग्नाला एक महिना बाकी होता, त्यावेळी भगवंताने माझी परीक्षा बघितली. माझे मेंटेनन्सचे काम होते. मी कामाला गेलो होतो, त्यावेळी माझ्या पायावर इंजन पडले होते. सर्वांना वाटत होते की, माझा पाय तुटला असणार. त्यावेळी मी भगवंताला हाक मारली, भगवंता मी कसे करणार? मला वाचवा....! मी माझ्या पायाला बघितले, तर मला थोडा मार लागलेला होता आणि गुटणा फाटलेला होता. तसेच मी दवाखान्यात गेलो आणि चार टाके लागले. औषधे वगैरे घेऊन घरी परत आलो आणि विचार केला की, आपल्याला भावाच्या लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहे. त्याच अवस्थेत मी दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. त्यावेळी माझे टेंडर सुद्धा संपलेले होते. भगवंताला विनंती केली की, भगवंता माझ्या भावाचं समोर लग्न आहे त्याकरिता मला पैशाची गरज आहे, मला काम मिळू द्या. भगवंताने मला काम दिले. त्यानंतर मला पहिले काम कांन्द्री या गावाचे सहा हजाराचे मिळाले आणि दुसरे काम कन्हान या गावचे सात हजाराचे मिळाले. दुपारी बारा वाजेपर्यंत कांन्द्री या गावचे काम करत होतो आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत कन्हान या गावचे काम पूर्ण करत होतो. याच कामानी भावाच्या लग्नाकरिता पैसे गोळा केले आणि भगवंताला योग मागितला की, माझ्या घरी प्रत्येक लग्नामध्ये भांडणे होत असतात, आता माझ्या भावाचे लग्न आहे तर माझ्या भावाचे लग्न चांगल्या प्रकारे पार पडू द्या. २ जून, २०१३ या दिवशी माझ्या भावाचे लग्न पार पडले. भगवंताने कुठेही कमीपणा पडू दिली नाही. माझा भाऊ घरगृहस्थिला लागता. त्यानंतर त्याला म्हटले की, तू तुझा संसार सांभाळ. असे करता-करता तीन महिने लोटून गेले. मला काम मिळत नव्हते. असे का बरं होते? म्हणून माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेच 

एक दिवस माझा भाऊ दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीने एकत्र राहत असल्यामुळे तिनी त्याला जेवण दिले. त्यानंतर माझ्या लक्षात आले, मी माझ्या भावाला समजावले की, तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर मार्गात यावं लागेल, नाहीतर वेगळे निघावे लागेल. त्यांने म्हटले की, मला वेगळे राहायचे आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी पण दारू पिऊन भांडण केले. माझा भाऊ आणि माझे बाबा वेगळे निघाले, तो दिवस सोमवार होता आणि मंगळवार पासून मला काम मिळाले. पहिला ठेका मला नऊ हजाराचा मिळाला. काही दिवसानंतर माझे बाबा मला बोलले की, मला तुझ्यामध्ये राहायचे आहे. तर मी म्हटले की, तुम्हाला माझ्यामध्ये राहायचे आहे तर दारू सोडावी लागेल. आम्ही दोघेही भाऊ जरी वेगळे राहात असलो तरी आमचा दरवाजा एकच होता. काही दिवसानंतर माझी सून ही गरोदर होती आणि तिने म्हटले की, मी काही दिवसाकरीता आईकडे जाणार आहे. त्यात आम्हाला कार्य करायचे होते. भगवंताला विनंती केली की, माझ्या भावाला तिकडेच नोकरी मिळू द्या आणि तसेच घडले. त्याला तिकडे नोकरी मिळाली, तेही फक्त दोन महिन्याकरीता. माझा भाऊ आणि त्याची पत्नी दोघेही त्याच्या सासरी गेली.

त्यानंतर १३ फेब्रुवारी, २०१४ या दिवशी त्यागाच्या कार्याकरिता शब्द घेऊन आलो. १४ फेब्रुवारी, २०१४ या दिवशी त्यागाच्या कार्याला सुरुवात केली. भगवंतांनी माझी पहिल्याच दिवशी परीक्षा घेतली. त्या दिवशी माझा लहान भाऊ घरी आला आणि माझ्या घरी डाळींबाचे झाड होते त्या झाडाचे डाळींब त्याने तोडले. मला विचात आला की, आता मी कसे करणार? पण त्याला भगवंताने सद्बुद्धी दिली. त्याने माझ्या मुलीला २ रुपये दिले. भगवंतांनी पुन्हा एकदा परीक्षा बघितली. माझी सून काही कागदपत्र घेण्याकरिता घरी आली आणि माझ्या भावाने आणखी डाळिंब तोडण्याचा विचार केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने म्हटले की, डाळींब नको तोडा. माझा भाऊ तोडायला गेला आणि लगेच तो खुर्चीवरुन पडला. असे घडताच तो निघून गेला. असे करता-करता माझे ३२ दिवस पार पडले. ३३ व्या दिवशी पुन्हा भगवंताने आमची पती-पत्नी दोघांची परीक्षा घेतली. आमचा एक पाय दुखायचा, तर एक हात दुखायचा. जिथे त्रास व्हायचा तिथे ज्योतीमधले तेल, अंगारा लावत होतो. त्यानंतर माझी मोठी मुलगी काही दिवस शौचालयला गेली नाही. तिचे जेवन बरोबर होते. मला विचार आला की, जेवण बरोबर असताना सुद्धा ही शौचालयला वगैरे जात नाही आहे. त्यागाची हवन जवळ येत होते आणि भगवंत परीक्षा बघत होते आणि त्या परिस्थितीत माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते. मला विचार आला की, मी त्यागाचे हवन कसे घडणार? भगवंताला योग मागितला.

त्यानंतर एक दिवस असेच मी मुलीला आणायला शाळेत गेलो तर एक व्यक्ती मला भेटले आणि बोलले की, एक काम आहे करशील काय? ते काम गहूहिवरा या गावाचे होते. मी म्हटले ठीक आहे. ज्यांच्याकडे काम होते मी त्यांच्याकडे गेलो. घरमालकीन काकूने विचारले किती किती पैसे घेणार, त्यावर मी म्हटले की, हे काम अकरा हजाराचे आहे. त्यावर घरमालकीण काकू म्हणाली की, मी नऊ हजार देणार. त्यावर मी नाही म्हटले. मी शेवट दहा हजार घेईल म्हणून बोललो. त्यावर घरमालकीण काकू बोलली की, तुम्हाला नऊ हजार मध्ये करायचे असणार तर करा, नाहीतर नको करा. त्यावर मी विचार केला की, हे काम मला भगवंतांनी दिलेले आहे. जर मी याला नकार देणार, तर माझ्यासारखा मूर्ख कोणी नाही. त्यानंतर मी ते काम केले. असे करता-करता माझे ४१ दिवस पूर्ण झाले. ४२ व्या दिवशी मी प्रसादी केली. त्यावेळी माझ्याकडे फक्त तीन हजार रुपये होते. मी कार्यकर्ता काकाजींकडे गेलो. काकजींनी मला सांगितले की, आपली परिस्थिती बघून हवनकार्य कर. मी शब्द घेऊन मंडळामध्ये गेलो. तिथून बाबांच्या फोटोचे देऊन मी प्रतिमा घरी आणली आणि भवन निधी आश्रम निधी बाकी ठेवली. मी त्यांना म्हटले की, मी मासिक नऊ हवने पूर्ण होत पर्यंत जमा करेल आणि २७ मार्च, २०१४ दिवशी त्यागाचे हवनकार्य पार पडले. त्या दिवशी खुशी झाली, आनंद वाटला आणि असे वाटत होते की, दिवाळीचा सण आहे. 

त्यानंतर आमचे मासिक हवन सुरू झाले. असे करता-करता माझे पाच मासिक हवन पूर्ण झाले आणि सहाव्या हवनाच्या दिवशी माझ्या बाबांनी आजूबाजूच्या लोकांचे एकूण दारू पिले आणि घरासमोर येऊन भगवंताविषयी उलट-सुलट बोलायला लागले आणि ते बघा भगवंतांनी त्यांना अशी शिक्षा दिली की, जे त्या खुर्चीवर बसून होते त्या खुर्चीवरून खाली पडले आणि ते एका पायाने अपंग झाले. त्यानंतर माझे बाबा लहान भावांमध्ये राहिले. एका पायाने अपंग झाल्यामुळे त्यांचे बाहेर जाणे बंदच झाले आणि दारू कायमची सुटली. अश्याप्रकारे भगवंतांनी आमची खूप परीक्षा बघितली, खूप अनुभव अनुभवायला मिळाले. आता माझे बाबा माझ्यात राहतात. आमचा परिवार सुखी, समाधानी आहेत.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

सेवक :- नारायण कृष्णरावजी मंडलेकर
पत्ता :-  मु. वॉर्ड नंबर- ०३ (माळीपुरा) कांद्री, पो. कन्हान  ता. पारशिवनी, जि. नागपूर
सेवक नंबर :- ३२९८३
मार्गदर्शक :- श्री. उमरावजी बांते, कन्हान
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.

■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन एस. पाटील: 7020000823

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】

🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.

मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]

बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]

वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
                    Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow  वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.

टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.

📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.